बाबो ! कतरिना कैफ सुपरहिरो बनून करणार धमाका, या ४ देशात करणार शूटिंग
By गीतांजली | Updated: October 21, 2020 19:00 IST2020-10-21T19:00:00+5:302020-10-21T19:00:02+5:30
पुन्हा एकदा अली अब्बास जफरच्या नव्या प्रोजेक्टमध्ये कतरिना कैफ दिसणार आहे.

बाबो ! कतरिना कैफ सुपरहिरो बनून करणार धमाका, या ४ देशात करणार शूटिंग
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ फिल्ममेकर अली अब्बास जफरसोबत पुन्हा एकदा काम करणार आहे. कतरिनाने याआधी 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'टायगर झिंदा' सारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते. आता पुन्हा एकदा अली अब्बास जफरच्या नव्या प्रोजेक्टमध्ये कतरिना कैफ दिसणार आहे.
हा एक बिग बजेट सिनेमा आहे जो नेटफ्लिक्ससाठी तयार करण्यात येतो आहे. यात कतरिना सुपरहिरोची भूमिका साकारणार आहे. 1987 मध्ये आलेला अनिल कपूर आणि श्रीदेवीचा सुपरहिट फिल्म 'मिस्टर इंडिया' वर आधारित असेल. सिनेमाचे बजेट खूप जास्त आहे आणि शूटिंग चार देशांमध्ये होणार आहे.जागरणच्या रिपोर्टनुसार अली अब्बास अलीकडेच म्हणाला की, सुपरहिरो सिनेमामधील काही सीन्ससाठी त्याने दुबई लॉकशन लॉक केले आहे. अलीने अबु धाबी आणि दुबईमधले काही लोकेशन्स बुक केले आहेत, जिथे सिनेमाची शूटिंग होणार आहे.
रिपोर्टनुसार, आता अली पॉलंड आणि जॉर्जियाला जाणार आहे, तिथं जाऊन काही लोकेशन बघून येणार. जफरचे म्हणणे आहे की शूटिंग तीन-चार देशांमध्ये करण्याचा प्लान आहे. त्याचसोबत सिनेमातील काही भागाचे शूटिंग भारतात करण्यात येणार आहे. दिल्ली हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये होणार आहे.कोरोनाच्या काळात लोकेशन शोधणं कठीण असल्याचे अलीचे म्हणणे आहे.असे सांगितले जात आहे की, अली अब्बासला पुढच्या वर्षी हा चित्रपट फ्लोअरवर घ्यायचा आहे, कारण यापूर्वी कतरिनाकडेही इतर अनेक प्रोजेक्ट आहेत.