Phone Bhoot Trailer: कतरिना कैफच्या ‘फोन भूत’चा ट्रेलर रिलीज...! हा ट्रेलर घाबरवत नाही, तर हसवतो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 06:22 PM2022-10-10T18:22:06+5:302022-10-10T18:23:28+5:30

Phone Bhoot Trailer: नाव ऐकून हा हॉरर सिनेमा असल्याचं वाटतं. पण प्रत्यक्षात हा एक जबरदस्त कॉमेडी सिनेमा आहे.  

katrina kaif upcoming horror comedy movie phone bhoot trailer | Phone Bhoot Trailer: कतरिना कैफच्या ‘फोन भूत’चा ट्रेलर रिलीज...! हा ट्रेलर घाबरवत नाही, तर हसवतो!!

Phone Bhoot Trailer: कतरिना कैफच्या ‘फोन भूत’चा ट्रेलर रिलीज...! हा ट्रेलर घाबरवत नाही, तर हसवतो!!

googlenewsNext

Phone Bhoot Trailer: कतरिना कैफ ( Katrina Kaif ), ईशान खट्टर (Ishaan Khatter ) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) स्टारर हॉरर कॉमेडी सिनेमा ‘फोन भूत’ (Phone Bhoot) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तर चला, आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाये. नाव ऐकून हा हॉरर सिनेमा असल्याचं वाटतं. पण प्रत्यक्षात हा एक जबरदस्त कॉमेडी सिनेमा आहे.  

2 मिनिटे 49 सेकंदाच्या ‘फोन भूत’चा ट्रेलर पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. ट्रेलरमध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर भूत पकडण्याचं काम करताना दिसतात. त्यांना कतरिनाची साथ मिळते. या ट्रेलरमध्ये काही भूत दिसतात.  ते पकडणारी तिकडीही दिसते. पण हे सर्वजण घाबरवण्याऐवजी हसवतात.  

‘फोन भूत’ हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतुहल आहे. ट्रेलरमध्ये याचं थोडक्यात उत्तर मिळतं. चित्रपटामध्ये कतरिना भूताच्या रुपात दिसणार आहे, तर सिद्धांत आणि ईशान हे भूत पकडणाऱ्या मॉर्डन तांत्रिकाच्या भूमिकेत आहेत. कतरिनाला अन्य भूतांना मोक्षप्राप्तीसाठी मदत करायची असते. यासाठी ती सिद्धांत-ईशानसह भूत पकडणारी टोळी बनवून एका अनोख्या प्रवासाला निघते.
गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रविशंकरन-जसविंदर सिंग बाथ लिखित, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित ‘फोन भूत’ येत्या 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय.  

‘फोन भूत’ हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे, त्यामुळे देखील रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.  

Web Title: katrina kaif upcoming horror comedy movie phone bhoot trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.