डबघाईत गेला कतरिना कैफचा 'सुपरहिरो' सिनेमा, निर्मात्यांनी घेतली माघार
By गीतांजली | Updated: November 10, 2020 19:00 IST2020-11-10T19:00:00+5:302020-11-10T19:00:04+5:30
कतरिनानेही या सिनेमाच्या तयारीला सुरुवात केली होती.

डबघाईत गेला कतरिना कैफचा 'सुपरहिरो' सिनेमा, निर्मात्यांनी घेतली माघार
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. कतरिना आणि अक्षय कुमार स्टारर फिल्म 'सूर्यवंशी' रिलीजसाठी सज्ज झाला होता, त्यावेळी लॉकडाऊनची घोषणा झाली. त्याचप्रमाणे ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत येणार 'फोन भूत' आणि सलमान खानसमवेत बहुप्रतिक्षित 'टायगर 3' सिनेमाही फसला आहे.
कतरिनाला आणखी एक धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार कतरिनासोबत फिल्ममेकर अली अब्बास जफरचा एका मोठ्या प्रोजेक्टची तयारी करत होता जो आता बंद होण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार कतरिना या प्रोजेक्टमध्ये सुपर हिरो किंवा सुपर हिरोईनची भूमिका करणार होती.
कतरिनानेही या सिनेमाच्या तयारीला सुरुवात केली होती आणि या आगामी भूमिकेसाठी चांगलाच घाम गाळत होती. पण बातमी अशी आहे की अली अब्बास यांना आतापर्यंत या चित्रपटासाठी कोणताही निर्माता सापडला नाही.
वास्तविक, सिनेमात बराच व्हीएफएक्सचा वापर होणार आहे त्यामुळे सिनेमाचा बजेट जास्त असणार आहे. कोरोनानंतर निर्माते या सिनेमात पैसे गुंतवण्याचे टाळत आहेत. 1987 मध्ये आलेला अनिल कपूर आणि श्रीदेवीचा सुपरहिट फिल्म 'मिस्टर इंडिया' वर आधारित असेल. सिनेमाचे बजेट खूप जास्त आहे आणि शूटिंग चार देशांमध्ये होणार होते.