Koffee With Karan 7 : करण जोहरच्या शोमध्ये ‘सुहागरात’बद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 03:51 PM2022-09-05T15:51:29+5:302022-09-05T16:34:07+5:30

Koffee With Karan 7 Promo : करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 7’ या चॅट शोच्या आगामी एपिसोडमध्ये ‘फोन भूत’ सिनेमाची टीम कॉफीवर येणार आहे. कतरिना कैफ, तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर या एपिसोडमध्ये धम्माल करणार आहेत. किमान शोचा प्रोमो पाहून तरी हेच दिसतंय...

Katrina Kaif Suggests Suhaagdin Idea After Alia Bhatt Called Suhaagraat A Myth Koffee With Karan 7 Promo | Koffee With Karan 7 : करण जोहरच्या शोमध्ये ‘सुहागरात’बद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ?

Koffee With Karan 7 : करण जोहरच्या शोमध्ये ‘सुहागरात’बद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ?

googlenewsNext

करण जोहरच्या (Karan Johar ) ‘कॉफी विद करण 7’ (Koffee With Karan 7) या चॅट शोच्या आगामी एपिसोडमध्ये ‘फोन भूत’ सिनेमाची टीम कॉफीवर येणार आहे. ब्युटिफुल कतरिना कैफ (Katrina Kaif )आणि तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर हे दोन हँडसम अभिनेते या एपिसोडमध्ये  धम्माल करणार आहेत. किमान शोचा प्रोमो पाहून तरी हेच दिसतंय. चॅट शोमध्ये कतरिना, ईशान व सिद्धांतसोबत मजेशीर गप्पा होतील, काही खुलासे होतील. शिवाय सुहागरात कॉन्सेप्टवर चर्चाही होईल. होय, बरोबर ऐकलंत. या एपिसोडमध्ये कतरिना ‘सुहागरात’ विषयावर बोलणार आहे.
 याआधी लग्नानंतर पहिल्यांदा ‘कॉफी विद करण 7’मध्ये आलेली आलिया भट ‘सुहागरात’ या विषयावर बोलली होती. सुहागरात वगैरे काहीही नसतं. त्यादिवशी नवरा-नवरी जाम थकलेले असतात आणि बिचारे दमून थेट झोपी जातात, असं आलिया म्हणाली होती. हाच धागा पकडून करण जोहरने कतरिनाला ‘सुहागरात’बद्दल विचारलं आणि कतरिनाने यावर असं काही उत्तर दिलं की, करणसोबत सिद्धांत व ईशान सगळ्यांचीच बोलती बंद झाली.

सुहागरात वगैरे काहीही नसतं, असं आलिया म्हणाली होती. तू यावर काय म्हणशील? असा प्रश्न करणने कतरिनाला यावेळी केलं. यावर तिने मजेशीर उत्तर देत सर्वांचं लक्ष वेधलं. ‘दरवेळी सुहागरातच असली पाहिजे असं काही नाही. सुहागदिनही असू शकतो,’असं ती म्हणाली. कतरिनाचं हे हटके उत्तर ऐकून करणसह ईशान आणि सिद्धांतला चांगलाच झटका बसला.

शोमध्ये सिद्धांत चतुर्वेदीनं तो पूर्णपणे सिंगल असल्याचा खुलासा केला. मी पूर्णपणे सिंगल आहे. इतका की आता माझ्यासोबत राहून ईशानही सिंगल झाला आहे, असं सिद्धांत म्हणाला.

‘कॉफी विद करण 7’मध्ये कतरिना, सिद्धांत व ईशान तिघेही ‘फोन भूत’ हा चित्रपट प्रमोट करायला पोहोचले होते. हा हॉरर कॉमेडी सिनेमा गुरमीत सिंहने दिग्दर्शित केला आहे. येत्या 4 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 
 

Web Title: Katrina Kaif Suggests Suhaagdin Idea After Alia Bhatt Called Suhaagraat A Myth Koffee With Karan 7 Promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.