​कॅटरिना कैफ बनवणार फिश, पॅनकेक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 15:09 IST2017-04-05T09:39:06+5:302017-04-05T15:09:06+5:30

कॅटरिना कैफच्या डोक्यावर तुम्हाला लवकरच शेफची हॅट दिसणार आहे. होय, आम्ही सांगतोय ते खरे आहे. कॅटरिना केवळ शेफ बनणार ...

Katrina Kaif to make fish, pancake! | ​कॅटरिना कैफ बनवणार फिश, पॅनकेक!

​कॅटरिना कैफ बनवणार फिश, पॅनकेक!

टरिना कैफच्या डोक्यावर तुम्हाला लवकरच शेफची हॅट दिसणार आहे. होय, आम्ही सांगतोय ते खरे आहे. कॅटरिना केवळ शेफ बनणार नाही तर वेगवेगळ्या डिशेसही करताना दिसणार आहे. कुठे? कुठल्याशा चित्रपटात नाही तर एका रिअ‍ॅलिटी वेब शोमध्ये. मिनी माथूर एक नवा वेब शो घेऊन येत आहे. या वेब शोमध्ये कॅट तिच्यातील कुकींग टॅलेन्ट दाखवणार आहे. आहे ना मज्जा! 
मिनी माथूर ही दिग्दर्शक कबीर खानची पत्नी. कबीर खान आणि मिनी या दोघांसोबत कॅटरिनाची चांगली बॉन्डिंग आहे. साहजिक मिनीने या शोसाठी विचारले तेव्हा कॅटने नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे लवकरच कॅटरिना मिनीसोबत वेगवेगळी पक्वाने तयार करताना दिसेल. फीश, पॅनकेक्स बनवण्यात कॅटला बºयापैकी गती आहे. या डिशेस कॅट या शोमध्ये बनवणार आहे. विशेष म्हणजे केवळ कॅटरिनाच नाही तर सलमान खानने सुद्धा या शोमध्ये यावे, यासाठी मिनी प्रयत्न करतेय. अर्थात मिनीचा हा प्रस्ताव सलमानने स्वीकारला वा नाही, ते ठाऊक नाही. पण कॅट मात्र राजी झाली आहे.  मिनीच्या या शोचे नाव आहे,‘मिनी ट्रक’. निखिल अडवाणी मिनीचा हा शो प्रोड्यूस करतो आहे. या शोमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आवडत्या डिशेस बनवताना दिसतील.

ALSO READ : सलमान खान व कॅटरिना कैफने साईन केला आणखी एक नवा चित्रपट!

सध्या कॅटरिना ‘टायगर जिंदा है’मध्ये बिझी आहे. यात कॅट सलमानसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. याशिवाय कॅटचा ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी तयार आहे. यात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. यादरम्यान कॅट कुकींगही करणार आहे. तिचे हे कुकींग टॅलेन्ट पाहायचे तर थोडी प्रतीक्षा मात्र करावीच लागेल.
  

Web Title: Katrina Kaif to make fish, pancake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.