कॅटरिना कैफने केले आगळे-वेगळे रेकॉर्ड; सलमान खानलाही टाकले मागे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 21:00 IST2018-01-07T15:30:16+5:302018-01-07T21:00:37+5:30

‘टायगर जिंदा है’ च्या जबरदस्त यशामुळे कॅटरिना कैफच्या नावे एक आगळे-वेगळे रेकॉर्ड झाले आहे. विशेष म्हणजे तिने सलमानलाही याबाबतीत मागे टाकले आहे.

Katrina Kaif made a different record; Salman Khan too behind! | कॅटरिना कैफने केले आगळे-वेगळे रेकॉर्ड; सलमान खानलाही टाकले मागे!

कॅटरिना कैफने केले आगळे-वेगळे रेकॉर्ड; सलमान खानलाही टाकले मागे!

परस्टार सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट भारतासह विदेशात चांगली कमाई करीत आहे. यशराज बॅनरच्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केल्याने, सलमान-कॅटचा हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘टायगर जिंदा है’ यशराज फिल्म्सचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या यादीत दुसºया स्थानावर ‘सुलतान’, तिसºया स्थानावर आमिर खान स्टारर ‘धूम-३’, चौथ्या स्थानावर ‘एक था टायगर’ तर पाचव्या स्थानावर शाहरूख खान स्टारर ‘जब तक है जान’ आहे. 

यशराज बॅनरच्या या टॉप-५ चित्रपटांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, यातील चार चित्रपटांमध्ये अभिनेत्री कॅटरिना कैफ हिने काम केले आहे. त्यामुळे कॅट यशराज बॅनरसाठी लकी अभिनेत्री आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. विशेष म्हणजे या आगळ्या-वेगळ्या रेकॉर्डमध्ये कॅटने सलमानलाही मागे टाकले आहे. कारण टॉप-५ चित्रपटांमध्ये सलमान केवळ तीनच चित्रपटांत आहे. 
 

तरण आदर्श यांच्यानुसार, एक था टायगर (२०१२), सुलतान (२०१६) आणि टायगर जिंदा है (२०१७) सलमान खान आणि यशराज बॅनर कॉम्बिनेशनचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट आहेत. तर कॅटरिनाने या बॅनरसोबत सहा हिट चित्रपट दिले आहेत. त्यामध्ये न्यूयॉर्क (२००९), मेरे ब्रदर की दुल्हन (२०११), एक था टायगर (२०१२), जब तक है जान (२०१२), धूम-२ (२०१३), टायगर जिंदा है (२०१७) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. 

सध्या कॅटरिना सलमान खानसोबत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये काम करीत आहे. आमिर खान आणि अमिताभ बच्चन स्टारर हा चित्रपट याच वर्षी ७ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमविला आहे. तर वर्ल्डवाइड कलेक्शन हे पाचशे कोटी रुपयांच्या आसपास आहे. 

Web Title: Katrina Kaif made a different record; Salman Khan too behind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.