Video: आई झाल्यानंतर ३ महिन्यांनी कॅमेऱ्यासमोर आली कतरिना कैफ, चाहत्यांना बघताच दिली क्यूट स्माइल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 09:04 IST2026-02-25T09:03:34+5:302026-02-25T09:04:29+5:30
आई झाल्यानंतर इतक्या महिन्यांनी कतरिना पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली आहे. कतरिनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Video: आई झाल्यानंतर ३ महिन्यांनी कॅमेऱ्यासमोर आली कतरिना कैफ, चाहत्यांना बघताच दिली क्यूट स्माइल
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. कतरिनाने नोव्हेंबर महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला. त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. प्रेग्नंसी दरम्यान कतरिनाने कॅमेरापासून दूर राहणं पसंत केलं होतं. डिलिव्हरीनंतरही ती कुठे दिसली नव्हती. आता आई झाल्यानंतर इतक्या महिन्यांनी कतरिना पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली आहे. कतरिनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कतरिनाचा व्हिडीओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना गाडीत बसल्याचं दिसत आहे. तिने चेहऱ्याला मास्क लावला आहे. चाहत्यांना बघताच अभिनेत्रीने त्यांना क्यूट स्माइलही दिल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. कतरिनाच्या बाजूला तिची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालाही बसल्याचं दिसत आहे. यास्मिन ही एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
कतरिना कैफ आणि विकी कौशलने २०२१ मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती. लग्नानंतर ४ वर्षांनी कतरिनाने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कतरिना आणि विकी आईबाबा झाले. त्यांनी आपल्या लेकाचं नाव विहान असं ठेवलं आहे.