लहानपणी कॅटरिना कैफ ‘या’ स्वप्नांमध्ये रमायची!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2017 15:59 IST2017-07-09T10:29:04+5:302017-07-09T15:59:04+5:30
लहानपणी प्रत्येकजण काल्पनिक दुनियेत हरवून जात असतो; याला बॉलिवूडची अभिनेत्री कॅटरिना कैफ हीदेखील अपवाद नाही. तिच्या आगामी ‘जग्गा जासूस’ ...
.jpg)
लहानपणी कॅटरिना कैफ ‘या’ स्वप्नांमध्ये रमायची!
ल ानपणी प्रत्येकजण काल्पनिक दुनियेत हरवून जात असतो; याला बॉलिवूडची अभिनेत्री कॅटरिना कैफ हीदेखील अपवाद नाही. तिच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका कार्यक्रमात तिने याविषयीचा उलगडा केला. कॅटरिनाने म्हटले की, लहानपणी मी स्वप्नांमध्ये रमत असे. मला कॉमिक बुक वाचायला आणि लहान मुलांवर आधारित चित्रपट बघायला खूप आवडत असे. वास्तविक ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात कॅटरिनाची भूमिका काहीशी मुलांसारखीच आहे.
कॅटरिनाने तिच्या लहानपणीचे दिवस आठवताना ‘आयएएनएस’ला सांगितले की, ‘लहानपणी मी स्वप्नांमध्ये रमलेली असायची, मला संगीत ऐकायला खूप आवडत असे. त्याशिवाय मला संगीतमय चित्रपट बघायला आणि मनातील गुजगोष्टींमध्ये रमायला आवडत असे. मला असे वाटते की, त्यामुळे मी माझ्याच जगतात हरवलेली असायची. कारण त्यावेळी मी खूप कल्पना करायची. त्यामुळेच कदाचित मी आज अभिनेत्री झाली असेल, असेही कॅटने म्हटले. पुढे बोलताना कॅटने म्हटले की, कॉमिक बुकबरोबरच मला ‘ब्यूटी अॅण्ड द बीस्ट’, ‘मॅरी पॉप्पिंस’ आणि ‘द साउंड आॅफ म्युझिक’ यांसारखे संगीतमय चित्रपट बघायला खूप आवडत असत.
![]()
कॅटने तिच्या आगामी ‘जग्गा जासूस’विषयी बोलताना म्हटले की, हा चित्रपट सार्वभौम आहे. कारण प्रत्येक स्तरातील प्रेक्षकाला हा चित्रपट अपील होणारा आहे. चित्रपटात कॅटबरोबर तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर अतिशय हटके भूमिकेत बघावयास मिळणार आहे. जेव्हा कॅटला तिच्या शूटिंगच्या अनुभवांविषयी विचारले तेव्हा तिने म्हटले की, ‘खरं तर चित्रपटाच्या शूटिंगला खूपच उशीर लागला. त्यामुळे मला या चित्रपटाची शूटिंग करताना खूपच मजा आली. थोडक्यात माझ्यासाठी हा एक अनोखा आणि रचनात्मक प्रवास होता. गेल्या तीन वर्षांत या चित्रपटाशी संबंधित सर्व लोकांच्या आयुष्यात बदल घडून आला आहे. त्यापैकीच मी एक आहे.
पुढे बोलताना कॅटने म्हटले की, चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून, त्याचे परिणाम लवकरच समोर येणार आहेत. सध्या कॅट आणि रणबीर या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करीत असून, प्रेक्षकांनाही चित्रपटाची आतुरता लागली आहे. हा चित्रपट १४ जुलै रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कॅट आणि रणबीर यांच्यात ब्रेकअप झाले होते. मात्र आता प्रमोशननिमित्त दोघे एकत्र आल्याने त्यांच्यात काहीसे पॅचअप होताना दिसत आहे.