कॅटरिना कैफवरुन हटत नाहीत टायगर सलमान खानची नजर... हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 12:33 IST2017-11-07T06:18:59+5:302017-11-07T12:33:05+5:30

या वर्षीचा मोस्ट अवेडेट चित्रपट टायगर जिंदा है चा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा टायगर आणि ...

Katrina Kaif does not go away Tiger Salman Khan's eyes ... proof of this | कॅटरिना कैफवरुन हटत नाहीत टायगर सलमान खानची नजर... हा घ्या पुरावा

कॅटरिना कैफवरुन हटत नाहीत टायगर सलमान खानची नजर... हा घ्या पुरावा

वर्षीचा मोस्ट अवेडेट चित्रपट टायगर जिंदा है चा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा टायगर आणि जोयाचा जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. 2012 मध्ये आलेल्या एक था टायगरनंतर पुन्हा एकदा सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळणार. 



ट्रेलर रिलीज होण्याआधी सलमान आणि कॅटरिनाचे काही फोटोसमोर आले आहेत. या फोटोंवरुन नजर हटणे तसे कठिणच आहे. तब्बल पाच वर्षांनंतर कॅट आणि सलमान एकत्र स्क्रिन शेअर करत असल्याने त्यांचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी सलमानची बहिण अर्पिता खानने दोघांचे शूटिंग दरम्यान एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला तिने एक कॅप्शनदेखील दिले होते. दोघे एकत्र खूप गोड दिसतात असे अर्पिताने लिहिले होते. त्याआधी अर्पिताच्या घरी झालेल्या दिवाळी पार्टीत ही कॅटरिनाने आवर्जून उपस्थिती लावली होती. तसेच टायगर जिंदा हैच्या शूटिंग दरम्यान सलमान आणि कॅटरिना पुन्हा एकदा एकमेंकाच्या जवळ आल्याची चर्चा होती. कारणामुळे युलियाने टायगर जिंदा हैच्या शूटिंग दरम्यान आबु धाबीला येण्यासाठी हट्ट केला होता. मात्र सलमान तसे होऊन दिले नाही. कॅटरिना सलमानच्या आयुष्यात परतल्यामुळे सलमान आणि युलिया वंतूर यांच्यात दुरावा आल्याची ही चर्चा होती.  



कॅटरिनासाठी सलमान खान लकी चार्म ठरला आहे असे  म्हटले तर वावगे ठरु नये. कारण टायगर जिंदा है चित्रपट साईन करताच आणखीन दोन मोठे चित्रपट तिच्या हाती लागले आहेत. होय, तुम्ही बरोबर वाचलात 'टायगर जिंदा है'नंतर कॅटरिना शाहरुखान आणि अनुष्का शर्मासोबत आनंद एल राय यांच्या चित्रपटात झळकणार आहे आणि त्यानंतर ती  कबीर खानच्या चित्रपटात दिसणार आहे. १९८३ मध्ये भारताला क्रिकेटमध्ये वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या टीमवर आधारित चित्रपटात ती दिसणार आहे. यात ती  कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिका साकारणार आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत कॅटरिना कैफ दिसणार आहे.

ALSO RAED :   ​सलमान खान 'रेस ३'च्या शूटिंगला नोव्हेंबरमध्ये होणार सुरुवात
 

Web Title: Katrina Kaif does not go away Tiger Salman Khan's eyes ... proof of this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.