अखेर कॅटरिना कैफने खरेदी केले नवे घर; फॅन्सना देणार पत्ता!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 18:04 IST2017-04-26T12:33:19+5:302017-04-26T18:04:04+5:30

अखेर कॅटरिना कैफ हिने तिच्यासाठी नवे घर खरेदी केले आहे. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने त्याची अपार्टमेंट सोडली होती. ...

Katrina Kaif bought a new home after all; Fans to give the address !! | अखेर कॅटरिना कैफने खरेदी केले नवे घर; फॅन्सना देणार पत्ता!!

अखेर कॅटरिना कैफने खरेदी केले नवे घर; फॅन्सना देणार पत्ता!!

ेर कॅटरिना कैफ हिने तिच्यासाठी नवे घर खरेदी केले आहे. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने त्याची अपार्टमेंट सोडली होती. तेव्हापासून ती नव्या घराच्या शोधात होती. आता तिने घर खरेदी केले असून, ही सुखद बातमी तिने तिच्या फॅन्सबरोबरही शेअर केली आहे. होय, कॅटरिनाने तिच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करताना लिहिले की, जर मी माझा पत्ता तुमच्याशी शेअर केला तर तुम्ही मला भेटायला येणार काय? कारण मला या आनंदक्षणी तुमच्याबरोबर पार्टी करायची असल्याचे कॅटरिनाने म्हटले आहे. 
 
फेसबुक पोस्टच्या माध्यमातून घर खरेदी केल्याची माहिती देणाºया कॅटरिनाने लिहिले की, ‘लवकरच मी माझ्या नव्या घरात शिफ्ट होणार आहे. जर मी तुम्हाला माझ्या नव्या घराचा पत्ता दिला तर तुम्ही मला भेटायला येणार काय?’ असा प्रश्न तिने तिच्या फॅन्सना विचारला. त्यावर काही तासांतच दोन लाखांपेक्षा अधिक लाइक्स देत फॅन्सनी तिच्या आनंदात सहभागी असल्याचे दाखवून दिले. शिवाय कॅटरिनाच्या या पोस्टला सात हजारांपेक्षा अधिक कमेंटही मिळाल्या. 

कॅटरिनाच्या एका लेडिज फॅन्सनी या पोस्टला उत्तर देताना लिहिले की, ‘काय हे खरं आहे. मी तुला भेटण्यासाठी मुंबईला आले होते. परंतु त्यावेळेस तु मुंबईमध्ये नव्हती. आता तुला भेटण्याची दुसरी संधी चालून आल्याने मी खूश आहे.’ तर दुसºया फॅन्सने लिहिले की, ‘तुला नक्कीच भेटावेसे वाटेल; मात्र मला माहीत आहे की, असे होऊ शकणार नाही. कारण मीडियाकडे तुझा पत्ता असेल अन् ते आमच्या अगोदर तुला भेटण्यासाठी तुझ्या नव्या घरी पोहोचणार आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की, कुठल्याही फॅन्सला त्याठिकाणी येऊ दिले जाईल.’

">


तर आणखी एका फॅन्सने लिहिले की, ‘मी तुला नक्कीच भेटायला येईल, तू तुझा पत्ता सांग, तुला भेटणे माझ्यासाठी स्वप्नवत असेल.’ फॅन्सच्या या कमेंट वाचून कॅटरिना नक्कीच सुखावली असेल; मात्र प्रश्न हा निर्माण होतो की, कॅटरिनाने तिच्या फॅन्सला दिलेली कमिटमेंट ती पाळणार काय? जर तिने नव्या घराचा आनंद फॅन्ससोबत शेअर केल्यास तिच्या फॅन्सना ही खूप मोठी पर्वणी ठरेल यात शंका नाही. 

सध्या कॅटरिनाचे दोन मोठे चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार असून, सलमान खानसोबतच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त आहे. ‘जग्गा जासूस’मध्ये ती रणबीर कपूरसोबत बघावयास मिळणार आहे तर ‘टायगर जिंदा है’मध्ये ती सलमान खानसोबत झळकणार आहे. 

Web Title: Katrina Kaif bought a new home after all; Fans to give the address !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.