प्रभासची नाही तर शाहरुख खानची हिरोईन बनणार कॅटरिना कैफ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 16:48 IST2017-05-15T12:30:57+5:302017-05-16T16:48:12+5:30

बाहुबली फेम प्रभाससोबत कॅटरिना कैफ एक चित्रपट दिसणार होती. साहो या चित्रपटात प्रभास आणि कॅटरिनाची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ...

Katrina Kaif to be Shahrukh Khan's heroine if not Prabhas? | प्रभासची नाही तर शाहरुख खानची हिरोईन बनणार कॅटरिना कैफ ?

प्रभासची नाही तर शाहरुख खानची हिरोईन बनणार कॅटरिना कैफ ?

हुबली फेम प्रभाससोबत कॅटरिना कैफ एक चित्रपट दिसणार होती. साहो या चित्रपटात प्रभास आणि कॅटरिनाची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती. मात्र आता अस कळतेय की कॅटरिना कैफ या चित्रपटात काम करणार नाही आहे. ही गोष्ट ऐकून कॅटरिना आणि प्रभासचे फॅन्स नक्कीच नाराज झाले असतील कारण दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर बघण्यास प्रेक्षक उत्सुक होते. कॅटरिना सध्या सलमान खानसोबत एक था टायगरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमान आणि कॅटरिना अबू धाबीमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करतायेत.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार कॅटरिनाने साहोमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफच्या जोडीचा जग्गा जासूस पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त ती किंगखान शाहरुख खानसोबत आनंद एल राय यांच्या चित्रपटातसुद्धा दिसणार आहे. कॅटरिनाकडे सध्या चित्रपटांची रांग आहे. रणबीर कपूरसोबत झालेल्या ब्रेकअप नंतर जग्गा जासूस हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे ब्रेकअपनंतरची दोघांची केमिस्ट्री बघण्यास प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. कारण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच त्यांचे ब्रेकअप झाले होते. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कॅटरिना कैफ गंभीरजखमी झाली होती. त्याच्या मानेला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. कॅटरिनासा दुखापत झाल्यानंतर काहीकाळ या चित्रपटाचे शूटिंगदेखील थांबवण्यात आले होते. जग्गा जासूस मध्ये एकूण 29 गाणी आहेत. 

Web Title: Katrina Kaif to be Shahrukh Khan's heroine if not Prabhas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.