सलमानला नाही तर आपल्यापेक्षा लहान वयाने असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय कतरिना ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 06:00 AM2019-11-16T06:00:00+5:302019-11-16T06:00:00+5:30

कतरिना कैफ गेल्या काही दिवसांपासून या अभिनेत्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची ऐकायला मिळत आहेत.

katrina kaif and vicky kaushal dinner date pics leak what going on | सलमानला नाही तर आपल्यापेक्षा लहान वयाने असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय कतरिना ?

सलमानला नाही तर आपल्यापेक्षा लहान वयाने असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय कतरिना ?

googlenewsNext

कतरिना कैफ आणि विकी कौशल नात्यात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहेत. पण या दोघांनीही या अफवांविषयी मौन राखणेच पसंत केले आहे.  हरलीन सेठीशी ब्रेकअप झाल्यानंतर विक्कीचं नाव कतरिनाशी जोडण्यात येते आहे. नुकतेच विकी आणि कतरिना यांच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार हे दोघंही मुंबईच्या एका हॉटेलमध्ये डिनर डेटसाठी गेले होते.


याआधी ही दिवाळी पार्टीनंतर ही दोघेही एकत्र बाहेर पडले. पण बाहेर मीडियाला पाहताच दोघांनीही मार्ग बदलला. पापाराझींना बघताच कतरीना अक्षरश: भींतीआड लपली. दुसरीकडे ‘तो मी नव्हेच’ अशा थाटात विकी कतरीनाला इग्नोर करून एकटा कारमध्ये बसून निघून गेला. अर्थात पापाराझींच्या नजरेतून भींतीआड लपलेल्या कतरीनाचा लेहंगा लपला नाही. कतरीना मीडियाला पाहून लपली, हे लगेच सर्वांना कळून आले. पापाराझींनी हा सगळा सीन कॅमे-यात कैद केला.




विकी व ती चांगले मित्र आहेत, असे असेल तर कतरीना का लपली, हे कळायला मार्ग नाही. काही दिवसांपूर्वी ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही दोघांचे वागणे बघून यांच्यात काहीतरी शिजतेय, अशी चर्चा सुरु झाली होती. कतरीना आणि विकी शेवटच्या रांगेत एकत्रच चित्रपट पाहायला बसले होते. चित्रपट संपल्यावर विकी आणि कतरिना थिएटरच्या दारापर्यंत एकत्र चालत आले परंतु, बाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सना पाहून मात्र त्यांनी आपला मार्ग बदलला होता. त्यानंतर कतरीना अभिनेता अर्जुन कपूरसोबत तिच्या गाडीपर्यंत जाताना दिसली होती.

Web Title: katrina kaif and vicky kaushal dinner date pics leak what going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.