'धुरंधर'च्या वादळात कार्तिकच्या 'तू मेरी...' सिनेमाची कमाई घटली, जाणून घ्या बॉक्स ऑफिस रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 10:29 IST2025-12-26T10:27:53+5:302025-12-26T10:29:00+5:30
कार्तिक आर्यनच्या सिनेमाला रणवीरच्या धुरंधर सिनेमाचं तगडं आव्हान आहे. जाणून घ्या सिनेमाने किती पैसे कमावले

'धुरंधर'च्या वादळात कार्तिकच्या 'तू मेरी...' सिनेमाची कमाई घटली, जाणून घ्या बॉक्स ऑफिस रिपोर्ट
'धुरंधर' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'धुरंधर'च्या कमाईचं वादळ इतकं मोठं आहे की, यात कार्तिक आर्यनचा 'तू मेरी में तेरा में तेरा तू मेरी' सिनेमाला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे कार्तिक आणि अनन्या पांडेच्या या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. जाणून घ्या
कार्तिकच्या सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले?
'तू मेरी में तेरा में तेरा तू मेरी' सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त ७.५ कोटींची कमाई केली आहे. कार्तिकच्या सिनेमाची जितकी हवा होती त्या तुलनेत सिनेमाची कमाई कमीच आहे. वीकेंडमध्ये हा सिनेमा १० कोटींचा व्यवसाय करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ख्रिसमसच्या सुट्टीचाही 'तू मेरी में तेरा में तेरा तू मेरी' इतका फायदा झालेला दिसत नाही. याचं कारण म्हणजे ५ डिसेंबरला रिलीज झालेला 'धुरंधर' सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसमध्ये चांगली कमाई करताना दिसत आहे.
'धुरंधर' सिनेमाने गुरुवारी २६ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 'धुरंधर' रिलीज होऊन तीन आठवडे झाले असले तरीही सिनेमा चांगली कमाई करत आहे. याशिवाय 'अवतार: फायर अँड अॅश' हा सिनेमाही भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. एकूणच 'धुरंधर' आणि 'अवतार ३' या सिनेमांमुळे कार्तिक आर्यनच्या 'तू मेरी में तेरा में तेरा तू मेरी' सिनेमाचं मोठं नुकसान झालेलं दिसतंय. आगामी दिवसात हा सिनेमा किती कमाई करतो, याची सर्वांना उत्सुकता आहे.