अक्षय कुमारपेक्षा...'हेरा फेरी ३' साठी कार्तिक किती मानधन घेणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 16:49 IST2022-11-14T16:46:43+5:302022-11-14T16:49:47+5:30

बॉलिवुडची आयकॉनिक कॉमेडी फिल्म 'हेरा फेरी ३' मध्ये अक्षय कुमार दिसणार नाही यामुळे चाहते फार नाराज झाले आहेत. दरम्यान कार्तिक आर्यनला मात्र लॉटरी लागली आहे.

kartik-aryan-has-signed-hera-pheri-3-in-half-of-amount-comapred-to-akshay-kumar-was-offered-to | अक्षय कुमारपेक्षा...'हेरा फेरी ३' साठी कार्तिक किती मानधन घेणार ?

अक्षय कुमारपेक्षा...'हेरा फेरी ३' साठी कार्तिक किती मानधन घेणार ?

Hera Pheri 3 बॉलिवुडची आयकॉनिक कॉमेडी फिल्म 'हेरा फेरी ३' मध्ये अक्षय कुमार दिसणार नाही यामुळे चाहते फार नाराज झाले आहेत. हेरा फेरी अक्षय कुमार शिवाय होऊच शकणार नाही असंच अनेक जण म्हणत आहेत. मात्र अक्षय कुमार ने स्वत: मान्य केले आहे की तो हा चित्रपट करणार नाही. स्क्रीप्ट आवडली नसल्याने त्याने या चित्रपटाला नकार दिला आहे. त्यामुळे यामध्ये आता कार्तिक आर्यन दिसणार आहे.

बाबू भैय्या, राजू आणि श्याम या भुमिकांमध्ये परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनी फारच मजा आणली. हेरा फेरी १ आणि हेरा फेरी २ मध्ये प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट झाली. आता हेरा फेरी ३ मध्ये राजू हा अक्षय कुमार नसेल हे ऐकल्यावर चाहत्यांचा मुड ऑफ होणारच. दरम्यान कार्तिक आर्यनला मात्र लॉटरी लागली आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमार घेत असलेल्या एकूण मानधनाच्या तुलनेत अर्ध्या मानधनात कार्तिकने हेरा फेरी ३ साईन केला आहे. 

'भुलभुलैय्या' या आणखी एका चित्रपटातुन अक्षय कुमारला लोकप्रियता मिळाली होती. मात्र त्याच्याही सीक्वेलमध्येही कार्तिक आर्यनचीच वर्णी लागली होती. आता हेरा फेरी ३ मध्ये कार्तिक आर्यनला प्रेक्षक पसंत करतात का हे बघणे महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त कार्तिक फ्रेडी या थ्रिलर चित्रपटातही दिसणार आहे ज्याचे टीझर पाहून फॅन्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याशिवाय किआरा अडवाणी सोबत कार्तिकचा सत्यप्रेम की कथा हा रोमॅंटिक सिनेमा येतोय. तर कॅप्टन इंडिया, शहजादा आणि आशिकी ३ हे देखील चित्रपट येणार आहेत. सध्या बॉक्स ऑफिसवर कार्तिकचाच बोलबोला दिसतोय.

Web Title: kartik-aryan-has-signed-hera-pheri-3-in-half-of-amount-comapred-to-akshay-kumar-was-offered-to