Video: कार्तिक आर्यनने घेतली चाहत्याची फिरकी, पुढे घडलं असं काही की तुम्हीही पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 13:13 IST2024-06-07T13:05:05+5:302024-06-07T13:13:35+5:30

कार्तिक आर्यनचा चाहता त्याच्यासाठी गाझियाबदवरुन आंबे घेऊन आला होता. पण पुढे एक मजेशीर घटना घडली (kartik aryan)

kartik aryan fan bring mangoes for him later funny reply to kartik video viral chandu champion actor | Video: कार्तिक आर्यनने घेतली चाहत्याची फिरकी, पुढे घडलं असं काही की तुम्हीही पोट धरुन हसाल

Video: कार्तिक आर्यनने घेतली चाहत्याची फिरकी, पुढे घडलं असं काही की तुम्हीही पोट धरुन हसाल

कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. कार्तिकने आजवर विविध सिनेमांमधून त्याच्या अभिनयाची छाप पाडली. 'लव्ह आज कल', 'भूल भूलैय्या 2', 'प्यार का पंचनामा' अशा अनेक सिनेमांमधून रोमँटिक हिरो म्हणून कार्तिक भेटीला आला. कार्तिकने त्याच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगने लोकांना खळखळून हसवलं. कार्तिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत एक चाहता त्याच्यासाठी आंबे घेऊन आला होता. मग पुढे दोघांमधला गमतीशीर संवाद पाहायला मिळतोय. 

कार्तिकच्या चाहत्याने आणले आंबे पण...

कार्तिक सध्या त्याच्या आगामी 'चंदू चँपियन' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटदरम्यान कार्तिकसोबत सेल्फी घेण्यासाठी एक चाहता त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. हा चाहता थेट गाझियाबादवरुन कार्तिकसाठी खास आंबे घेऊन आला होता. कार्तिकने त्या चाहत्याच्या खांद्यावर हात ठेवला. "अरे तू मला आंबे आणले होतेस ना? कुठे गेले?"

कार्तिकच्या प्रश्नावर चाहत्याचं भन्नाट उत्तर

पुढे या व्हिडीओत पाहायला मिळतं की चाहता कार्तिकला म्हणतो, "मी आंबे आणले होते पण तुमची वाट बघता बघता सर्व आंबे मीच संपवले. तुम्ही खूप उशीर आलाच नाहीत." चाहत्याच्या या उत्तरावर कार्तिकच्या बॉडीगार्डसकट सर्वजण खळखळून हसायला लागले. कार्तिकने सुद्धा हसत हसत चाहत्याला निरोप दिला. अशाप्रकारे कार्तिक आर्यन आणि त्याच्या चाहत्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. कार्तिकचा आगामी 'चंदू चँपियन' सिनेमा १४ जूनला थिएटरमध्ये रिलीज होतोय.

Web Title: kartik aryan fan bring mangoes for him later funny reply to kartik video viral chandu champion actor