'लव्ह आज कल 2'शूटिंग संपल्यानंतरही अशा प्रकारे एकमेकांना कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकत्र घालवतायत वेळ, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 14:41 IST2019-07-13T14:38:52+5:302019-07-13T14:41:47+5:30
'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे कार्तिक खऱ्या अर्थाने एक अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. तो इंडस्ट्रीत स्थिरावत नाही तोच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो.

'लव्ह आज कल 2'शूटिंग संपल्यानंतरही अशा प्रकारे एकमेकांना कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकत्र घालवतायत वेळ, फोटो आले समोर
कार्तिक आर्यन आणि छोटे नबाव सैफ अली खानची लेक अभिनेत्री सारा अली खानच्या अफेअरच्या चर्चा रंगल्यात. पुन्हा एकदा दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इम्तियाज अलीचा सिनेमा 'लव्ह आज कल 2'च्या सेटवर दोघांच्या बॉन्डिंग विषयीच्या चर्चा ऐकायला मिळायच्या. आता शूटिंग संपल्यानंतर हे दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत.मध्यंतरी जेव्हा जेव्हा कार्तिक मुंबईच्या बाहेर जात होता तेव्हा सारा त्याला आपल्या गाडीतून ड्रॉप करण्यासाठी गेली होती. मोकळ्या वेळात सारा आणि कार्तिक फिरायला जातात. जसा वेळ मिळेल तसे हे लव्हबर्ड्स एकत्र वेळ घालवताना दिसतात.
रोज या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. या दोघांचे सोशल मीडियावर चाहतेही प्रचंड असल्यामुळे चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो. 'कॉफी विद करण' या शोमध्ये साराने कार्तिकवर क्रश असून त्याला डेट करायला आवडेल असं म्हटलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. मात्र कार्तिक अजूनही आपण सिंगल असल्याचं सांगतोय. शिवाय लवकरच मिंगल व्हायला आवडेल हे सांगायलाही तो विसरत नाही.
'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे कार्तिक खऱ्या अर्थाने एक अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. तो इंडस्ट्रीत स्थिरावत नाही तोच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. सारा अली खानसह त्याचे अफेअर असल्याच्या बातम्या संपता न संपता आता त्याचे आणखीन एका अभिनेत्री बरोबर नाव जोडले जात आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून चंकी पांडेची लेक अनन्या पांडे यांच्यासोबत तो नात्यात असल्याच्या या अफवा आहेत.