शुभमंगल! कार्तिक आर्यनची बहीण कृतिका अडकली लग्नबंधनात, मांडवातील खास Video व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 10:59 IST2025-12-05T10:57:45+5:302025-12-05T10:59:19+5:30
अभिनेता कार्तिक आर्यनची बहीण डॉ. कृतिका तिवारीचं लग्न ग्वाल्हेरमध्ये पार पडलं. 'तेरा यार हूं मैं' या गाण्यावर डान्स करत कृतिकाने भाऊ कार्तिक आर्यनबरोबर मांडवात एंट्री केली.

शुभमंगल! कार्तिक आर्यनची बहीण कृतिका अडकली लग्नबंधनात, मांडवातील खास Video व्हायरल!
Kartik Aaryan's sister Kritika marries : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याच्या घरी सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. काल, ४ डिसेंबर रोजी त्याची लाडकी बहीण डॉ. कृतिका तिवारी विवाहबंधनात अडकली. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या कृतिकाने एका पायलटसोबत म्हणजेच तेजस्वी सिंगशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्याचे अनेक मनमोहक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कृतिकाचं लग्न ग्वाल्हेरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलं. कृतिकाच्या लग्नातील सर्वात खास क्षण ठरला, तिची मांडवातील एन्ट्री. कृतिकाने लाडका भाऊ कार्तिक आर्यनसोबत 'तेरा यार हूं मैं' या गाण्यावर डान्स करत मांडवात एन्ट्री केली. भाऊ-बहिणीच्या या गोड केमिस्ट्रीने चाहत्यांचं मन जिंकलं.
कृतिका तिवारीने या खास लग्नाच्या दिवसासाठी गुलाबी रंगाचा लेहेंगा निवडला होता. ज्यात ती प्रचंड सुंदर एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती. तर तेजस्वीने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघांचाही लूक त्यांच्या शाही विवाहसोहळ्याला साजेसा होता.
दरम्यान, कृतिकाच्या लग्नापूर्वीच्या विधींमध्येही कार्तिकनं धमाल केली. कृतिकाच्या हळदी समारंभाचे आणि संगीत सोहळ्याचे अनेक फोटो कार्तिकनं सोशल मीडियावर शेअर केलेत. कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो "तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी" मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अनन्या पांडे देखील आहे आणि हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.