कार्तिक आर्यन देणार चाहत्यांना सरप्राइज, या दिवशी OTTवर पाहू शकता 'भूल भुलैया ३'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 12:20 IST2024-12-26T12:20:16+5:302024-12-26T12:20:55+5:30
Kartik Aryan's Bhool Bhulaiya 3 : कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला आहे. चाहते आता OTT वर रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.

कार्तिक आर्यन देणार चाहत्यांना सरप्राइज, या दिवशी OTTवर पाहू शकता 'भूल भुलैया ३'
कार्तिक आर्यन(Kartik Aryan)चा 'भूल भुलैया ३' (Bhool Bhulaiya 3) हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. चाहत्यांना त्याची हॉरर-कॉमेडी इतकी आवडली की या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले. एवढेच नाही तर कमाईच्या बाबतीत अजय देवगणच्या सिंघम अगेनलाही मागे टाकले होते. चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर, हा चित्रपट ओटीटीवर लाँच करण्यासाठी सज्ज आहे. भूल भुलैया ३ OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची हिंट देण्यात आली आहे.
भूल भुलैया ३चा क्लायमॅक्स खूपच दमदार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. प्रत्येकाच्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये कार्तिक आर्यन कॅमेऱ्याच्या दिशेने धावताना आणि परत येताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना नेटफ्लिक्सने लिहिले की, TUDUM, कार्तिक आर्यनकडे तुमच्यासाठी ख्रिसमस सरप्राईज आहे. लवकरच येत आहे. व्हिडिओच्या शेवटी २७ डिसेंबर असे लिहिले आहे. यानंतर चाहत्यांना वाटते की भूल भुलैया ३ सिनेमा २७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
'भूल भुलैया ३'ने जगभरात केली इतकी कमाई
अनीज बज्मी दिग्दर्शित भूल भुलैया ३ ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ४०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला खूप पसंती मिळाली आहे. कार्तिक आर्यनची जादू केवळ भारतातच नाही तर परदेशातही चालली. सिंघम अगेन 'भूल भुलैया ३' सोबत रिलीज झाला होता. सिंघम अगेनचा ट्रेलर समोर आला तेव्हा चाहत्यांना वाटले की भूल भुलैया ३ त्याच्यासमोर फार काळ टिकू शकणार नाही. पण घडले अगदी उलट. सुरुवातीला कार्तिक कलेक्शनशी स्पर्धा करताना दिसला आणि नंतर चित्रपट मागे सोडला.