कॉफी डेटनंतर सारा अली खानसोबत कार्तिक आर्यनला 'या' शहरात करायचीय पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 16:07 IST2019-03-26T16:04:48+5:302019-03-26T16:07:12+5:30
करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती

कॉफी डेटनंतर सारा अली खानसोबत कार्तिक आर्यनला 'या' शहरात करायचीय पार्टी
ठळक मुद्दे'लव आजकल 2'चे पहिल्या शेड्यूलचे शूटिंग दोघांनी नुकतेच दिल्लीत केले आहेसाराने फिल्मफेअर ट्रॉफीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे
करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून सारा अन कार्तिक कायम चर्चेत आहेत. इम्तियाज अलीच्या या जोडीला आपल्या आगामी सिनेमासाठी साईन केले. 'लव आजकल 2'चे पहिल्या शेड्यूलचे शूटिंग दोघांनी नुकतेच दिल्लीत केले आहे.
साराला तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी फिल्मफेअर बेस्ट डेब्यू ऐक्ट्रेस अॅवॉर्ड सन्मानित करण्यात आले आहे. साराने फिल्मफेअर ट्रॉफीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोच्या खाली कमेंटमध्ये कार्तिकने लिहिले आहे की, अभिनंदन सारा, आता कॉफीवर काम चालणार नाही तर दिल्लीमध्ये पार्टी पाहिजे.
काही दिवसांपूर्वा सारा आणि कार्तिकचा दिल्लीच्या रस्त्यांवरुन बाईक राईड करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कार्तिक बाईक चालवतोय आणि सारा त्याच्या मागच्या सीटवर बसलेली दिसत होती. सारा व कार्तिकचा हा चित्रपट ‘लव आज कल’चा सीक्वल असल्याचे म्हटले जातेय. अर्थात अद्याप याबाबत कुठलीही घोषणा झालेली नाही. २००९ मध्ये आलेला सैफ अली खान व दीपिका पादुकोणचा ‘लव आजकल’ सुपरडुपर हिट झाला होता. सारा आणि कार्तिकसोबतच अभिनेता रणदीप हुड्डासुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.