कार्तिक आर्यनने धुडकावली पान मसाल्याची जाहिरात; ९ कोटींवर सोडलं पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 14:59 IST2022-08-29T14:57:37+5:302022-08-29T14:59:33+5:30
kartik aaryan: अलिकडेच अक्षय कुमार ट्रोल झाल्यामुळे KGF स्टार यशने पान मसाल्याची जाहिरात नाकारली होती. त्याच्यानंतर आता कार्तिक आर्यननेदेखील कोटयावधींची ऑफर धुडकावून लावली आहे.

कार्तिक आर्यनने धुडकावली पान मसाल्याची जाहिरात; ९ कोटींवर सोडलं पाणी
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (kartik aaryan) याने नुकतीच एक पान मसाल्याची जाहिरात नाकारली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीसाठी त्याला कोटयावधी रुपये ऑफर करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील त्याने या ऑफरवर पाणी सोडलं आहे. काही दिवसांपूर्वीच पान मसाल्याची जाहिरात केल्यामुळे अक्षय कुमार ट्रोल झाला होता. तेव्हापासून अनेक कलाकारांनी पान मसाल्याची जाहिरात करण्यास नकार दिल्याचं समोर येत आहे.
अलिकडेच अक्षय कुमार ट्रोल झाल्यामुळे KGF स्टार यशने पान मसाल्याची जाहिरात नाकारली होती. त्याच्यानंतर आता कार्तिक आर्यननेदेखील कोटयावधींची ऑफर धुडकावून लावली आहे.
'भूल भुलैय्या 2', 'पती पत्नी और वो', 'लुकाछुपी', 'प्यार का पंचनामा' अशा कितीतरी चित्रपटांमधून कार्तिकने स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे चित्रपट वा जाहिरातींमध्ये त्याला घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. त्यामुळेच त्याला तब्बल ९ कोटींची एक पान मसाल्याची जाहिरात ऑफर करण्यात आली होती. मात्र, त्याने ही ऑफर नाकारली आहे. त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये त्याची चर्चा रंगली आहे. याविषयी 'बॉलिवूड हंगामा'च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
आतापर्यंत अजय देवगण, शाहरुख खान, अक्षय कुमार अशा कित्येक दिग्गज कलाकारांनी पान मसाल्याची जाहिरात केली आहे. मात्र, या सगळ्यांना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. इतकच नाही तर अलिकडेच अक्षय कुमारला प्रचंड ट्रोल केलं होतं. ज्यामुळे त्याला जाहीरपणे नेटकऱ्यांची माफी मागावी लागली होती.
दरम्यान, कार्तिक लवकरच Shehzada या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनॉन स्क्रीन शेअर करणार आहे. तसंच तो Captain India, Freddy आणि SatyaPrem Ki Katha या चित्रपटांमध्येही झळकणार आहे.