Kartik Aaryan:Sara Ali Khan: कोण आहे ती ‘मिस्ट्री गर्ल’? जिच्यासोबत कार्तिक आर्यनने केले नवीन वर्षाचे सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:56 IST2023-01-03T13:48:16+5:302023-01-03T14:56:12+5:30
कार्तिक आर्यन लंडनमध्ये सारा अली खानसोबत व्हॅकेशनवर असल्याचं बोललं जात होते, पण तो....

Kartik Aaryan:Sara Ali Khan: कोण आहे ती ‘मिस्ट्री गर्ल’? जिच्यासोबत कार्तिक आर्यनने केले नवीन वर्षाचे सेलिब्रेशन
बॉलिवूडमधील बहुतेक सेलिब्रिटींनी व्हॅकेशनवर जाऊन दणक्यात नवीन वर्षाचे स्वागत केलं. त्यांच्यामध्ये अशी काही कपल्स आहेत ज्यांनी सीक्रेट पद्धतीनं न्यू इअर सेलिब्रेशन केलं, परंतु लाईमलाईटच्या जगात कोणतेच सीक्रेट फार काळ लपून राहू शकत नाही. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनसोबतही असंच काहीसं घडलं आहे. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी अभिनेता लंडनमध्ये पोहोचला होता, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो तिथं एकटाचं नव्हता.
अलीकडेच, कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने चाहत्यांना एक हिंट दिली आहे की तो एकटा नाही. विशेष म्हणजे सारा अली खानही सध्या लंडनमध्ये आहे. दोघांनीही एकत्र अनेक फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये लोकेशनही एकच होते. ब्रेकअपनंतरही दोघे एकत्र दिसल्याने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे, पण कार्तिक लंडनमध्ये सारासोबत नाही तर निहारिका ठाकूरसोबत आहे.
कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले- 'माझ्यासाठी फक्त ब्लॅक टी आहे.' कार्तिकचा हा फोटो लंडनमधील क्लेरिजमधला आहे. काही वेळाने निहारिका ठाकूरनेही एक फोटो पोस्ट केला आणि लोकेशनमध्ये क्लेरिज असे लिहिले. लंडनमधील कार्तिक आणि निहारिकाचा एकाच ठिकावरील फोटो आणखीच दुसऱ्या गोष्टीकडे इशारा करतोय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निहारिका ठाकूर प्रतीक कुहाडची एक्स गर्लफ्रेंड आहे. प्रतीक आणि निहारिका बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अलीकडेच एका मुलाखतीत प्रतीकने त्याच्या ब्रेकअपबद्दल सांगितले होते की सिंगल आहे. निहारिका डॉक्टर आहे आणि आता बातम्या येत आहेत की निहारिका आणि कार्तिक एकमेकांना डेट करत आहेत.