पति पत्नी और वो : कार्तिक आर्यनचा मॅरिटल रेपवरील डायलॉग अडकला वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीला मागावी लागली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 19:51 IST2019-11-07T19:50:40+5:302019-11-07T19:51:12+5:30
कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'पति पत्नी और वो'च्या ट्रेलरमधील एका डायलॉगवर नेटकरी संतापले आहेत

पति पत्नी और वो : कार्तिक आर्यनचा मॅरिटल रेपवरील डायलॉग अडकला वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीला मागावी लागली माफी
अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'पति पत्नी और वो'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर व अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. त्यात या ट्रेलरमधील एक डायलॉग वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
'पति पत्नी और वो' चित्रपटाच्या ट्रेलरमधील बिवी से सेक्स मांग ले, तो हम भिकारी. बिवी को सेक्स मना कर दिया तो हम अत्याचारी और किसी तरह जुगाड लगा के उससे सेक्स हासिल कर ले ना तो बलात्कारी भी हम है या कार्तिकच्या संवादावर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे.
अशा प्रकारचे विनोद सहन केले जाणार नाहीत, अशा शब्दांत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर भूमीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
माफी मागताना भूमी म्हणाली की, हा चित्रपट सेक्सच्या विषयाला चालना देणारा नाही आहे. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो. प्रेक्षकांच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. चित्रपटाच्या टीममधल्या कोणत्याही सदस्याची तशी विचारसरणी नाही.
या चित्रपटात कार्तिक आर्यन हा चिंटू त्यागी या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील पतीची भूमिका साकारत आहे. तर भुमी त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.
यामध्ये अनन्या पांडे एका इंटर्नची भूमिका साकारत आहे.