कार्तिक आर्यनने खरेदी केली आलिशान रेंज रोव्हर SUV, किंमत ऐकून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 10:51 IST2024-03-15T10:48:52+5:302024-03-15T10:51:50+5:30

कार्तिक आर्यनने महागडी रेंज रोव्हर suv खरेदी केलीय. किंमत जाणून घ्या एका क्लिकवर

KARTIK AARYAN BRINGS HOME SWANKY RANGE ROVER SV WORTH 6 CRORES | कार्तिक आर्यनने खरेदी केली आलिशान रेंज रोव्हर SUV, किंमत ऐकून व्हाल थक्क!

कार्तिक आर्यनने खरेदी केली आलिशान रेंज रोव्हर SUV, किंमत ऐकून व्हाल थक्क!

कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अल्पावधीतच कार्तिकने बॉलिवूडमध्ये छाप पाडलीय. 'प्यार का पंचनामा' असो की 'भूल भुलैय्या...' कार्तिकचे प्रत्येक सिनेमे बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी करत आहेत. कार्तिक सध्या 'भूल भूलैय्या 3' च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. कार्तिक सध्या यशाच्या शिखरावर असताना त्याच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडलीय. 

कार्तिकने आलिशान लग्झरी SUV गाडी खरेदी केलीय. कार्तिककडे गाड्यांचं कलेक्शन असून त्याने रेंज रोव्हर SUV ला या कलेक्शनमध्ये समाविष्ट केलंय. या गाडीची किंमत तब्बल ६ कोटी इतकी आहे. 'भूल भूलैय्या 3' च्या शुटींगमध्ये व्यस्त असताना कार्तिक आर्यनने ही गुड न्यूज सर्वांना दिलीय. कार्तिकचे आई - बाबा गाडीची पुजा करत असतानाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलेत.

कार्तिकची गाडी काळ्या रंगाची असून चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलंय. कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर... तो सध्या 'भूल भूलैय्या 3' च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनीस बाझमी करत असून सिनेमात तृप्ती डिमरी आणि विद्या बालन कार्तिकसोबत झळकणार आहेत. याशिवाय कार्तिक कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅँपियन' सिनेमात झळकणार आहे.

 

Web Title: KARTIK AARYAN BRINGS HOME SWANKY RANGE ROVER SV WORTH 6 CRORES