सारा खान आणि कार्तिक आर्यनची शानदार केमिस्ट्री, लव आज कलमधील 'हां मैं गलत' गाणं आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 17:15 IST2020-01-29T17:15:49+5:302020-01-29T17:15:55+5:30
Love Aaj Kal Movie : या गाण्याला अरिजीत सिंगने गायले आहे.

सारा खान आणि कार्तिक आर्यनची शानदार केमिस्ट्री, लव आज कलमधील 'हां मैं गलत' गाणं आऊट
कार्तिक आर्यन आणि सारा अली खानचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'लव आजकल'मधील 'हां मैं गलत' हे नवं गाणं रिलीज झाले आहे. या गाण्याला अरिजीत सिंगने गायले आहे आणि गाण्याला संगीत प्रीतमने दिले आहे. हे एक पार्टी साँग असून सारा आणि कार्तिकनेचा गाण्यातील डान्ससुद्धा कमाल आहे. दोघांची मस्त केमिस्ट्री गाण्यात दिसतेय. 'हां मै गलत' हे गाणं सैफ अली खानच्या 'लव आज कल'मधील ट्विस्ट गाण्याचे रिमिक्स आहे.
लव्ह आज कल'च्या ट्रेलरमध्ये १९९० आणि २०२० मधल्या काळातील काहीशी टिपिकल आणि मॉर्डन लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. 'लव्ह आज कल'मध्ये सारा, कार्तिकशिवाय रणदीप हुड्डा, आरुषी शर्मादेखील मुख्य भूमिकेत आहेत. २००९ मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या 'लव्ह आज कल' चित्रपटाचा हा दुसरा सीक्वल आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी 'लव्ह आज कल' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .प्रेमात असणाऱ्या कार्तिकची सारा आणि आरुषीसोबत मजेशीर केमिस्ट्री ट्रेलरमध्ये पहायला मिळाली. 'लव्ह आज कल'मध्ये काही जुन्या गाण्यांना रिक्रिएट करण्यात आले आहे. तसेच कार्तिकचे सारा व आरूषीसोबत चित्रपटात बरेच किसिंग सीनही ट्रेलरमध्ये पहायला मिळले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून सारा-कार्तिकच्या प्रेमाच्या, ब्रेकअपच्या अनेक चर्चा सुरु होत्या. यावर दोघांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. पण आता बहुचर्चित असणारी सारा-कार्तिकची ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.