कार्तिक आर्यन लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर करणार 'धमाका'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 15:51 IST2021-01-18T15:50:47+5:302021-01-18T15:51:10+5:30
कार्तिक आर्यन शेवटचा सारा अली खानसोबत लव आज कालमध्ये दिसला होता.

कार्तिक आर्यन लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर करणार 'धमाका'
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन शेवटचा सारा अली खानसोबत लव आज कालमध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर आता कार्तिक लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका करणार आहे. त्याचा आगामी चित्रपट धमाका डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धमाका चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याबरोबरच प्रदर्शित व्हावा अशी इच्छा आहे. अशा परिस्थितीत आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. 22 नोव्हेंबरला चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि शूटिंग डिसेंबरमध्ये 10 दिवसात पूर्ण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार निर्माता रॉनी स्क्रूवाला आणि दिग्दर्शक राम माधवानी यांना हा चित्रपट लवकर रिलीज करायचा आहे. यापूर्वी हा चित्रपट दिग्दर्शक राहुल ढोलकिया दिग्दर्शित करणार असल्याची चर्चा होती.
जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यनने नवीन वर्षाचे स्वागत गोव्यात केले. गोव्यातील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्यानंतर त्या दोघांच्या अफेयर्सची चर्चा रंगली होती. मात्र, याबाबत त्यांनी काहीच खुलासा केला नाही. गोव्यातील फोटोमध्ये त्या दोघांनी एक सारख्याच रंगाचे कपडे घातले होते.
कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या कार्तिकजवळ बरेच चित्रपट आहेत. भूल भूलैया 2 मध्ये कार्तिक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत कियारा आडवाणी दिसणार आहे. तसेच तो दोस्ताना 2 मध्ये जाह्नवी कपूरसोबत दिसणार आहे.