​केआरकेने मोहनलाल यांना म्हटले छोटा भीम...वाचा काय आहे, नेमके प्रकरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 15:42 IST2017-04-19T10:12:34+5:302017-04-19T15:42:34+5:30

कॉन्टोवर्सी किंग कमाल आर खान उर्फ केआरकेचे नाव मीडियात आले म्हणजे, त्याने कुठली तरी कुरापत काढली, हे नक्की समजून ...

KARK told Mohanlal to be a little bit ... Read what is, exactly the episode! | ​केआरकेने मोहनलाल यांना म्हटले छोटा भीम...वाचा काय आहे, नेमके प्रकरण!

​केआरकेने मोहनलाल यांना म्हटले छोटा भीम...वाचा काय आहे, नेमके प्रकरण!

न्टोवर्सी किंग कमाल आर खान उर्फ केआरकेचे नाव मीडियात आले म्हणजे, त्याने कुठली तरी कुरापत काढली, हे नक्की समजून घ्यायचे.  गतवर्षी अजय देवगणसोबतचा केआरकेचा वाद चांगलाच गाजला होता. यानंतरही केआरकेने अनेक वाद ओढवून घेतले. पण त्याचा ताजा कारनामा ऐकाल तर तुम्हालाही विश्वास होणार नाही. होय, केआरकेने आता कुण्या बॉलिवूड स्टारला नाही तर मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना लक्ष्य केलेय. होय, आपल्या वादग्रस्त टिष्ट्वटमुळे ओळखल्या जाणाºया केआरकेने मोहनलाल यांना ‘छोटा भीम’ म्हटले. यानंतर twitter वर अर्थातच केआरकेला मोहनलालच्या चाहत्यांनी अक्षरश: झोडपून काढले. 

काल-परवा  मोहनलाल यांनी ‘महाभारत’ सिनेमाची घोषणा केली. शिवाय ते या चित्रपटात भीम साकारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘रंदमूजन’ नामक या बिग बजेट चित्रपटात पितामह भीष्म यांच्या नजरेतून महाभारताची कथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटासाठी युएईचे एक उद्योगपती बी. आर. शेट्टी पुढे सरसावले आहे.  ते हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहे.  ुया सिनेमाचे बजेट हे १००० हजार कोटी रुपयांचे असल्याचे बोलले जात आहे. हा सिनेमा एशियातील दुसरा सर्वात महागडा सिनेमा असेल. रजनीकांतच्या ‘2.0’ आणि ‘बाहुबली’ला हा सिनेमा मागे टाकेल. हा सिनेमा दोन भागांमध्ये तयार केला जाणार आहे. 

{{{{twitter_post_id####}}}}

ALSO READ : ​‘कॉन्टोवर्सी किंग’ केआरकेने रणवीर सिंहला संबोधले अतिरेकी!

चित्रपटाच्या या बजेटवरूनच केआरकेने मोहनलाल यांना लक्ष्य केले आहे. ‘सर मोहनलाल, तुम्ही छोटा भीम वाटता. अशात तुम्ही या चित्रपटात भीमाची भूमिका कसे साकारणार? तुम्ही बी. आर. शेट्टीचे १०० कोटी रूपयांची नासाडी का करू इच्छिता?’ असे tweet केआरकेने केले आहे. 

Web Title: KARK told Mohanlal to be a little bit ... Read what is, exactly the episode!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.