करिश्मा कपूरचा पहिला पती संजय कपूर करणार प्रिया सचदेवशी लग्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 12:07 IST2017-03-16T06:35:23+5:302017-03-16T12:07:07+5:30
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे लग्न 2003ला धुमधडाक्यात झाले होते. या दोघांना समायरा आणि कियान अशी दोन मुले ...

करिश्मा कपूरचा पहिला पती संजय कपूर करणार प्रिया सचदेवशी लग्न?
क िश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे लग्न 2003ला धुमधडाक्यात झाले होते. या दोघांना समायरा आणि कियान अशी दोन मुले आहेत. लग्नानंतर काहीच वर्षांत या दोघांमध्ये खटके उडायला लागले आणि त्या दोघांनी वेगळे व्हायचे ठरवले. दोघांनी परस्परसंमतीने 2014मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. यांच्या घटस्फोटाला 2016ला न्यायालयाकडून संमती देण्यात आली. घटस्फोटानंतर करिश्मा आणि संजय यांची दोन्ही मुले करिश्मासोबत राहात आहेत.
घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाच संदीप तोष्णिवाल करिश्माच्या आयुष्यात आला. त्याच्यासोबत करिश्माचे अफेअर असल्याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. त्यांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात आले आहे. न्यायालयातदेखील करिश्मासोबत तो असायचा असे म्हटले जाते. तसेच शशी कपूर यांच्या घरी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीला ते दोघे एकाच गाडीतून आले होते. हे दोघे काही महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याची चर्चा आहे. करिश्मानंतर आता संजय कपूरनेदेखील आयुष्यात सेटल व्हायचे ठरवले असल्याचे म्हटले जात आहे.
संजय कपूर आणि प्रिया सचदेव हे गेल्या काही महिन्यांपासून नात्यात आहेत. त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. संजय आणि प्रिया एप्रिलमध्ये न्यूयॉर्कमध्ये लग्न करणार असून या लग्नाला केवळ त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीच उपस्थित राहाणार आहे. खूपच कमी जणांना या लग्नाबाबत सांगण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. संजय आणि त्याच्या कुटुंबीयांना या लग्नाविषयी काहीही बोलण्यास नकार दिला असला तरी या दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.
प्रिया सचदेव एक मॉडेल असून तिचे पहिले लग्न अनेक हॉटेल्सचा मालक असलेल्या विक्रम चटवालसोबत झाले होते.