करिश्मा कपूरचे कमबॅक, लवकरच दिसणार ह्या वेबसीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 21:00 IST2019-02-18T21:00:00+5:302019-02-18T21:00:00+5:30

करिश्मा लवकरच अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार आहे. एकता कपूरच्या आगामी वेबसीरिजमध्ये ती झळकणार असल्याचे बोलले जात आहे.

Karisma Kapoor's Comeback, soon to be seen in the web site | करिश्मा कपूरचे कमबॅक, लवकरच दिसणार ह्या वेबसीरिजमध्ये

करिश्मा कपूरचे कमबॅक, लवकरच दिसणार ह्या वेबसीरिजमध्ये

बॉलिवूडची लोलो म्हणजेच अभिनेत्री करिश्मा कपूर बऱ्याच कालावधीपासून रुपेरी पडद्यापासून गायब आहे. ती रुपेरी पडद्यावर झळकत नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रीय असते. मात्र आता करिश्मा लवकरच अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार आहे. एकता कपूरच्या आगामी वेबसीरिजमध्ये ती झळकणार असल्याचे बोलले जात आहे.

करिश्मा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डेंजरस इश्क' या चित्रपटात शेवटी झळकली होती. त्यानंतर फार कमी वेळा ती मोठ्या पडद्यावर आली. करिश्मा लवकरच वेबसीरिजच्या माध्यमातून कमबॅक करत असून या सीरिजची निर्मिती प्रसिद्ध निर्माती एकता कपूर करणार आहे.

ऑल्ट बालाजीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारी ही सीरिज अमेरिकन टीव्ही सीरिज 'प्रिटी लिटील लायर्स'वर आधारित असून करिश्मा यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'मेंटलहुड' असे या सीरिजचे नाव असून यामध्ये संघर्ष करणाऱ्या पाच मातांची कथा उलगडली जाणार आहे.


दरम्यान, या सीरिजची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या सीरिजचे आधी 'मेंटल'असे नाव ठेवण्यात येणार होते. मात्र अभिनेता सलमान खान आणि सोहेल खान यांनी या पूर्वीच या नावाच्या टायटलची नोंद केली आहे. त्यामुळे एकताने या सीरिजचे नाव बदलून 'मेंटलहुड' असे केले आहे.

Web Title: Karisma Kapoor's Comeback, soon to be seen in the web site