आमिर खानसोबत ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमातल्या किसिंग सीनवर 24 वर्षांनंतर करिश्मा कपूरने केला खुलासा म्हणाली.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 15:31 IST2021-05-07T15:31:33+5:302021-05-07T15:31:44+5:30

 राजा हिंदुस्तानी हिट होण्यामागे बरीच कारणं असली तरी सिनेमातल्या किसिंग सीननेही धुमाकूळ घातला होता. एका सीनमुळे सिनेमाची बरीच चर्चा झाली होती.

Karisma Kapoor reveals after 24 years on the kissing scene in 'Raja Hindustani' with Aamir Khan | आमिर खानसोबत ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमातल्या किसिंग सीनवर 24 वर्षांनंतर करिश्मा कपूरने केला खुलासा म्हणाली.....

आमिर खानसोबत ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमातल्या किसिंग सीनवर 24 वर्षांनंतर करिश्मा कपूरने केला खुलासा म्हणाली.....

बोल्ड सीन, किसिंग हे आजच्या चित्रपटात सर्रास पाहायला मिळतं. रसिकांनाही यांत काहीही वावगं वाटत नाही.  बोल्ड सीन आणि किसिंग सीनशिवाय चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही.मात्र २५ वर्षापूर्वीचा काळ असा नव्हता. सिनेमात अशा प्रकारे सीन दाखवण्याचे प्रमाण कमीच होते. खूप कमी सिनेमात बोल्ड सीन चित्रीत व्हायचे. करिश्मा कपूर आणि आमिर खान यांचा  राजा हिंदुस्तानी  सिनेमा १९९६ साली प्रदर्शित झाला होता.  हा सिनेमा त्या काळात बराच हिट झाला.  राजा हिंदुस्तानी हिट होण्यामागे बरीच कारणं असली तरी सिनेमातल्या किसिंग सीननेही धुमाकूळ घातला होता. एका सीनमुळे सिनेमाची बरीच चर्चा झाली होती.

करिश्मा कपूर आणि आमिर खान यांच्यावर हा सीन चित्रित करण्यात आला आहे. सिनेमापेक्षा करिश्मा कपूर आणि आमिर खान यांच्या किसिंग सीनचीच जास्त चर्चा रंगायची. रुपेरी पडद्यावर सीन अगदी छोटा असला तरी या एका सीनसाठी तब्बल तीन दिवस लागले होते. करिश्मा आणि आमिर दोघेही या सीनसाठी कंम्फर्टेबल नव्हते. त्यामुळे वारंवार रिटेक्स वर रिटेक्स व्हायचे. 

हा सीन शूट करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा करिश्माचा थरकाप उडाला होता.सीन सुरु असताना करिश्मा थरथर कापत असल्याचे तिने म्हटले होते. याला दुसरे कारणही होते. ऊटीमध्ये सिनेमाचे शूटिंग सुरु होते. संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास हा सीन शूट करण्यात आला होता.त्यात फेब्रुवारी महिना, भयंकर थंडी होती. इतक्या थंडीत शूटिंग करणे कठिण जात होते. त्यामुळे हा सीन कधी संपेल याचीच तिला जास्त चिंता होती. विशेष म्हणजे चित्रपटसृष्टीतील सर्वांत मोठा किसिंग सीन राजा हिंदुस्तानी सिनेमाचाच मानला जातो.

ना सिनेमा, ना जाहिरात...आलिशान लाईफस्टाईलसाठी करिष्मा काय करतेय माहित्येय?

90 च्या दशकातील अभिनेत्रींच्या यादीत करिश्मा कपूर आघाडीची अभिनेत्री मानली जाते. एकेकाळी सा-यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी करिश्माने अनेक रोमँटिक सुपरहिट सिनेमा बॉलिवूडला दिले आहेत. गेल्या काही वर्षापासून सिनेमापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह संपर्कात असते.

Web Title: Karisma Kapoor reveals after 24 years on the kissing scene in 'Raja Hindustani' with Aamir Khan