करिश्मा व संजय अखेर कायदेशीररित्या विभक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 19:16 IST2016-06-13T12:24:34+5:302016-06-13T19:16:25+5:30
करिश्मा कपूर व संजय कपूर या दोघांच्या वाटा कधीच वेगळ्या झाल्या होत्या. पण आता हे दोघे कायदेशीररित्या विभक्त झालेत. ...
.jpg)
करिश्मा व संजय अखेर कायदेशीररित्या विभक्त
क िश्मा कपूर व संजय कपूर या दोघांच्या वाटा कधीच वेगळ्या झाल्या होत्या. पण आता हे दोघे कायदेशीररित्या विभक्त झालेत. करिश्मा व संजयचा कायदेशीर घटस्फोट झालाय. संजय कपूरचे वकील अमन हिंगोरानी यांनी या बातमीला दुजोरा दिला. करिश्मा व संजयमधील वाद सुप्रीम कोर्टात सांमजस्याने निघाली निघाला आहे, हे सांगितल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाने या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. करिश्मा व संजयमधील आर्थिक आणि मुलांच्या ताब्यासंदर्भातील वाद निकाली निघाना आहे. कोर्टाने मुलांचा ताबा करिश्माला दिला आहे. याशिवाय संजयचे मुंबईतील खारस्थित घर करिश्माला मिळाला आहे. संजयने मुलांच्या नावे १४ कोटींचे बॉन्ड खरेदी केले आहेत. याचे महिना १० लाख व्याज करिश्माला मिळणार आहे. करिश्मा व संजय २००३ मध्ये लग्नगाठीत अडकले होते. २०१४ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.