मुलांची कस्टडी अखेर करिश्मालाच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 20:41 IST2016-04-09T03:41:37+5:302016-04-08T20:41:37+5:30
गेल्या अनेक महिने एकमेकांवर चिखलफेक करणारे करिश्मा कपूर आणि संजय कपूर हे दोघे आज अखेर एका ठोस निर्णयावर पोहोचले. ...

मुलांची कस्टडी अखेर करिश्मालाच!!
ग ल्या अनेक महिने एकमेकांवर चिखलफेक करणारे करिश्मा कपूर आणि संजय कपूर हे दोघे आज अखेर एका ठोस निर्णयावर पोहोचले. परस्परांपासून विभक्त होण्याच्या पद्धतीसंदर्भात एक समझौत्यावर दोघांचीही सहमती झाली. तूर्तास त्याच्या बातमीनुसार, दोन्ही मुलांची कस्टडी करिश्माला मिळाली आहे. म्हणजेच, मुलांची कस्टडी मिळवण्यात करिश्मा यशस्वी ठरली आहे. करिश्मा व संजयला समायरा आणि कियान अशी दोन मुले आहेत. या दोघांची कस्टडी करिश्माकडे असेल. संजयला त्यांना भेटता येईल. प्राप्त माहितीनुसार, संजयच्या मालकीचे मुंबईतील घर करिश्माला मिळले. याशिवाय संजयला १४ कोटी रूपयांचा बॉन्ड मुलांच्या नावे द्यावा लागेल. याच्या दरमहा येणाºया व्याजातून दोन्ही मुलांचा खर्च भागवण्यात येईल. दोघांमधील समझौत्यानुसार, करिश्मा संजय व त्याच्या आईविरूद्धची कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दोन आठवडयात मागे घेईल. २०१४ मध्ये करिश्मा व संजयने आपसी सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र नोव्हेंबर २०१५ मध्ये करिश्माने आपसी सहमतीचा अर्ज मागे घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर करिश्माने माझ्या संपत्तीवर डोळा ठेवून केवळ त्याचसाठी माझ्याशी लग्न केल्याचा आरोप संजयने केला होता. यानंतर काही कळायच्या आत करिश्माने संजयविरूद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. मात्र आता हे सगळे प्रकरण एका आपसी समझौत्यावर येऊन थांबले आहे. २००३ मध्ये संजय व करिश्मा यांचा विवाह झाला होता. मात्र यानंतर काही काळातच त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली होती. अखेर २०१० मध्ये करिश्माने संजयचे घर सोडले होते.