करिष्मा कपूरच्या फॅमिली फोटोत तैमूर हरवला, नेटिझन्सची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 12:24 IST2019-07-09T12:16:36+5:302019-07-09T12:24:30+5:30

करिष्माच्या सोशल मीडियावर एक परफेक्ट फॅमिली फोटो आहे. मात्र फॅन्सना फॅमिली फोटोत तैमूर हवा आहे.

Karishma Kapoor shares family photo, users asking where is Taimur? | करिष्मा कपूरच्या फॅमिली फोटोत तैमूर हरवला, नेटिझन्सची नाराजी

करिष्मा कपूरच्या फॅमिली फोटोत तैमूर हरवला, नेटिझन्सची नाराजी

बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरच्या एका फोटोमुळे फॅन्स नाराज झालेत. नुकतंच करिष्माने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोत करिष्माचं संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे. करिष्माच्या फोटोत करिष्माची दोन मुलं, तिचे पालक आणि बहीण करिना कपूर खान दिसत आहे. या फोटोत करिष्माचं संपूर्ण कुटुंब दिसत असलं तरी या फोटोत एक व्यक्ती दिसत नाही. ती म्हणजे चिमुकला तैमूर अली खान.  

करिष्माने फोटो सोशल मीडियावर शेअर करताच त्यात तैमूर न दिसल्याने फॅन्स नाराज झाले. यूझर्सनी करिष्माला प्रश्न विचारला की तैमूर कुठे आहे? मात्र करिष्माच्या सोशल मीडियावर एक परफेक्ट फॅमिली फोटो आहे. मात्र फॅन्सना फॅमिली फोटोत तैमूर हवा आहे. तैमूर सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. त्याच्या बाललीला आणि त्याचा निरागसपणा साऱ्यांनात भावतो.बालपणीच तैमूरची लोकप्रियता बड्या सेलिब्रिटींपेक्षा जास्त आहे. तैमूरने फॅन्सच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. त्यामुळे करिष्माच्या फॅमिली फोटोत तैमूर नसल्याने फॅन्स नाराज झालेत. 


तैमुर इतका लोकप्रिय आहे की, त्याच्या लोकप्रियता त्याच्या शेजाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. इतकी की, हे शेजारी थेट पोलिस ठाण्यात पोहोचले होते. त्यांनी तैमूर अली खानबद्दल नाही पण त्याचे फोटो घेण्यासाठी गोंधळ घालणा-या पापाराझींविरोधात तक्रार दाखल केली होती. तैमूरचे फोटो घेण्यासाठी रोज बिल्डींगसमोर पापाराझींची गर्दी असते.

रोज संध्याकाळी या बिल्डींगसमोर जणू पापाराझींची जत्रा भरते. त्यांच्याकडून होणारा गोंधळ, आवाज यामुळे बिल्डिंगमधील सगळेच वैतागले होते. अखेर या रोजच्या कटकटीला कंटाळून बिल्डिंमधील लोकांनी पापाराझींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला सैफनेच ही तक्रार दाखल केल्याचे मानले गेले. पण अलीकडे एका मुलाखतीत खुद्द सैफने याचा इन्कार केला होता.

Web Title: Karishma Kapoor shares family photo, users asking where is Taimur?