करीनाला वाटतेय रणबीर-कॅट यावे एकत्र !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 10:16 IST2016-06-04T04:46:26+5:302016-06-04T10:16:26+5:30

 बोल्ड कमेंट्स आणि निर्णय घेण्यात करिना कपूर खान अतिशय अग्रेसर आहे. माध्यमांचाही कोणताच विचार न करता मुलाखती देणे हे ...

Kareena thinks Ranbir-Kat come together! | करीनाला वाटतेय रणबीर-कॅट यावे एकत्र !

करीनाला वाटतेय रणबीर-कॅट यावे एकत्र !

 
ोल्ड कमेंट्स आणि निर्णय घेण्यात करिना कपूर खान अतिशय अग्रेसर आहे. माध्यमांचाही कोणताच विचार न करता मुलाखती देणे हे तिचे विशेष. पण तिच्याकडे बहिणीचे एक प्रेमळ मनही आहे.

त्यामुळे तिला वाटतेय की, ‘ दुरावलेले रणबीर आणि कॅटरिनाने एकत्र यावेत. किती दिवस आता ते दोघे अबोला ठेवणार आहेत. ‘जग्गा जासूस’ च्या सेटवरही ते अगदी मुग गिळूनच असतात. पण, मला वाटतं की, या सेटवरच त्यांचे प्रेम पुन्हा फु लावे. त्यांनी सर्वप्रथम त्यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण करावे. त्यानंतरच त्यांच्यात प्रेमाचे अंकुर फुलेल असे वाटतेय.’

पुढे त्यांच्या जोडीविषयी सांगतांना ती म्हणते,‘ मला माहित नाही की ते लग्न केव्हा करणार? पण, ते एकमेकांसाठी ‘मेड फॉर इच अदर’ आहेत. कॅ टरिना त्याच्यासाठी अतिशय योग्य मुलगी आहे. त्यामुळे मला तरी ते एकत्र पहायला आवडतील. पाहूया तो दिवस केव्हा येतो?’ 

Web Title: Kareena thinks Ranbir-Kat come together!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.