‘तरिफां...’ गाण्यात करिना-सोनमने लावला तडका; बादशाहच्या रॅपवर दाखविल्या हॉट अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 16:22 IST2018-05-02T09:48:44+5:302018-05-02T16:22:58+5:30

सोनम कपूर आणि करिना कपूरचा बहुचर्चित ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून, त्यामध्ये करिना-सोनमने हॉटनेसचा तडका लावला.

Kareena-Sonam launches tadka in 'Taifif ...' Hot King on the King's Rapp! | ‘तरिफां...’ गाण्यात करिना-सोनमने लावला तडका; बादशाहच्या रॅपवर दाखविल्या हॉट अदा!

‘तरिफां...’ गाण्यात करिना-सोनमने लावला तडका; बादशाहच्या रॅपवर दाखविल्या हॉट अदा!

िनेत्री करिना कपूर-खान, सोनम कपूर आणि स्वरा भास्करच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. गाण्याचे लिरिक्स ‘होर दस किन्नी तरिफां चाहिदी तेनू’ असे आहे. या गाण्यात सोनम कपूर आणि करिना कपूर एक क्लब डान्स करताना दिसत आहेत. हे गाणे प्रमोशनल सॉन्ग आहे. ज्यामध्ये टॉप रॅपर बादशाह लिरिक्स देताना दिसत आहे. यू-ट्यूबच्या जी म्युझिक कम्पनी चॅनलवर हे गाणे रिलीज करताच काही क्षणात ते इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. बादशाह नेहमीप्रमाणे आपल्या अंदाजात गाण्याला रंग देताना दिसत आहे. तर करिना-सोनमच्या हॉट अदा घायाळ करणाºया आहेत. 



काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. आतापर्यंत ‘वीरे दी वेडिंग’चा ट्रेलर दोन कोटींपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. रिया कपूर निर्मित या चित्रपटाची कथा चार मुली आणि त्यांच्या मैत्रीवर आधारित आहे. पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणाºया करिना आणि सोनमची जोडी व्हिडीओमध्ये जबरदस्त दिसत आहे. त्याचबरोबर स्वरा भास्कर, शिखा तलसानिया आणि सुमित व्यास यांचीदेखील झलक या गाण्यात दिसत आहे. चित्रपटात लव, सेक्स, रिलेशनशिप, लग्न आणि मैत्री याविषयी दाखविण्यात येणार आहे. 



दरम्यान, ‘वीरे दी वेडिंग’च्या माध्यमातून करिना तब्बल दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करीत आहे. तैमूरच्या जन्मानंतर हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची कथा करिनाच्या पात्राच्या अवतीभोवती फिरणारी आहे. जिचे लग्न अटेंड करण्यासाठी तिन्ही मैत्रिणी (सोनम, स्वरा आणि शिखा) जात असतात. चित्रपटात ‘परमानेंट रूममेट’ फेम सुमित व्यास करिनाच्या लव-इंटरेस्टची भूमिका साकारत आहे. शशांक खेतान दिग्दर्शित या चित्रपटाची शूटिंग दिल्ली आणि फुकेट येथे झाली आहे. या चित्रपटाला अनिल कपूरची मुलगी अन् सोनम कपूरची बहीण रिया कपूरने प्रोड्यूस केले आहे. चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Kareena-Sonam launches tadka in 'Taifif ...' Hot King on the King's Rapp!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.