बॉलिवूडची 'बेबो' ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज; सस्पेन्स थ्रिलर 'जाने जा' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 17:45 IST2023-09-05T17:42:26+5:302023-09-05T17:45:11+5:30
करिना कपूरच्या 'जाने जान' या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Kareena Kapoor
बॉलिवूडची बेबो म्हणून अवघ्या प्रसिद्ध असलेल्या करीना कपूरची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. करिना कपूरच्या 'जाने जान' या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून करीना कपूर ओटीटीवर पदार्पण करत आहे.
'जाने जान' चित्रपटामध्ये करीना कपूर एक सिंगल मदरच्या भुमिकेत आहे. या सिनेमात करीना कपूरसह विजय वर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुजॉय घोष यांनी चित्रपट 'जाने जान'चे दिग्दर्शन केले आहे.
'जाने जान' चित्रपटाचा ट्रेलर सस्पेन्स आणि थ्रिलरने परिपुर्ण दिसत आहे. 'जाने जान' सिनेमाचा ट्रेलर पाहून उत्सुकता आणखी ताणली आहे. हा चित्रपट २१ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची कथा ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या जपानी कादंबरीवर आधारित आहे.
करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ‘लाल सिंग चड्ढा’ रिलीज झाला. या चित्रपटात ती आमिर खानसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला. 'लाल सिंग चड्डा' फ्लॉप झाल्यानंतर करीनाच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे सर्वांचंच लक्ष होतं. करीना कपूर खानची लोकप्रियता अफाट असून मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. त्यामुळे करीना कायमच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते.