सासूबाईंच्या बर्थडेसाठी करिना कपूरची खास पोस्ट; शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 18:01 IST2023-12-08T18:00:07+5:302023-12-08T18:01:30+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आज 79 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Kareena Kapoor's special post for mother-in-law's birthday; Shared photos | सासूबाईंच्या बर्थडेसाठी करिना कपूरची खास पोस्ट; शेअर केले फोटो

सासूबाईंच्या बर्थडेसाठी करिना कपूरची खास पोस्ट; शेअर केले फोटो

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्रींचा उल्लेख केला तर त्यात शर्मिला टागोर यांचे नाव नक्कीच येईल. सुपरस्टार सैफ अली खानची आई शर्मिला टागोर आज 79 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  शर्मिला टागोर यांची सून अर्थात करीना कपूरनेही आपल्या सासूबाईंसाठी खास पोस्ट केली आहे. 

 करीना कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शर्मिला टागोर यांच्यासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.कॅप्शनमध्ये  करीनाने लिहले, 'सासूचा वाढदिवस 8-12-2023'.  या फोटोंमधून दोघींमधील बॉन्डिंग स्पष्टपणे दिसून येत आहे.  याआधीही करीनाने आपल्या सासुचे अनेकदा कौतुक केले आहे. 'मला शर्मिला टागोर यांच्यासारखी सासू मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते', असे ती एका मुलाखतीत म्हणाली होती. 

शर्मिला टागोर यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्यांनी अनेक वेळा अशी भूमिका साकारल्या आहेत, ज्यात त्यांच्या अभिनयाने वेगळी छाप सोडली आहे. 'काश्मीर की कली, नायक, सावन की घटा, मिलन की रात, आराधना, अमर प्रेम आणि नसीब' अशा अनेक  चित्रपटांमध्ये काम केले आहे. शर्मिला टागोर शेवटच्या मनोज बाजपेयींच्या 'गुलमोहर' सिनेमात दिसल्या होत्या. 

Web Title: Kareena Kapoor's special post for mother-in-law's birthday; Shared photos