'जब वी मेट'साठी करीना कपूरला नव्हती पहिली पसंती, सलमानच्या या अभिनेत्रीची झालेली निवड, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 09:56 IST2025-08-21T09:55:46+5:302025-08-21T09:56:34+5:30

Jab We Met : 'जब वी मेट' चित्रपटात शाहिद कपूर आणि करीना कपूरची जोडी खूप आवडली. या चित्रपटातील करीनाच्या चुलबुल्या शैलीचे खूप कौतुक होत आहे. पण करीनाच्या आधी या चित्रपटासाठी आणखी एका अभिनेत्रीला साइन करण्यात आले होते.

Kareena Kapoor wasn't Salman's first choice for 'Jab We Met', but this actress was chosen... | 'जब वी मेट'साठी करीना कपूरला नव्हती पहिली पसंती, सलमानच्या या अभिनेत्रीची झालेली निवड, पण...

'जब वी मेट'साठी करीना कपूरला नव्हती पहिली पसंती, सलमानच्या या अभिनेत्रीची झालेली निवड, पण...

दिग्दर्शक इम्तियाज अली(Imtiyaj Ali)चा 'जब वी मेट' (Jab We Met Movie) हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि करीना कपूर(Kareena Kapoor)ची जोडी खूप आवडली. या चित्रपटातील करीनाच्या चुलबुल्या शैलीचे खूप कौतुक होत आहे. पण करीनाच्या आधी या चित्रपटासाठी आणखी एका अभिनेत्रीला साइन करण्यात आले होते. तिने स्वतः हे उघड केले. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सलमान खानच्या 'तेरे नाम' या चित्रपटातील निर्जरा म्हणजेच भूमिका चावला (Bhumika Chawla) होती.

सलमान खानच्या 'तेरे नाम' या हिट चित्रपटात निर्जरा ही भूमिका साकारणारी भूमिका चावलाने एकदा 'जब वी मेट' आणि 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटांमध्ये तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्री वर्णी लागली, याबद्दल सांगितले होते. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्रीने सांगितले की, इम्तियाज अलीच्या 'जब वी मेट' या चित्रपटात करीना कपूरने तिची जागा घेतली तेव्हा ती सुरूवातीला थोडी निराश झाली होती.

'जब वी मेट'चं नाव आधी होते 'ट्रेन'
भूमिका चावलाने हेदेखील सांगितले होते की, ग्रेसी सिंगला तिच्या जागी संजय दत्तच्या 'मुन्ना भाई एमबीबीएस' चित्रपटात कास्ट करण्यात आले होते. भूमिका म्हणाली होती, ''मला फक्त एकदाच वाईट वाटले होते, जेव्हा मला 'जब वी मेट' साइन केले होते पण ते यशस्वी झाले नाही. त्यात बॉबी देओलची जोडी माझ्यासोबत होती आणि चित्रपटाचे नाव ट्रेन होते. त्यानंतर, शाहिद कपूर आणि मी, नंतर शाहिद आणि आयशा आणि त्यानंतर शाहिद आणि करीना कपूर यांना कास्ट करण्यात आले. गोष्टी अशा झाल्या, पण ते ठीक आहे. मला फक्त एकदाच वाईट वाटले आणि पुन्हा कधीही नाही, कारण मी पुढे गेले. मी त्याबद्दल जास्त विचार करत नाही.''


काही गोष्टी कलाकारांच्या हातातही नसतात...
ती म्हणाली होती, ''मी मुन्नाभाई एमबीबीएस साइन केला होता. पण तो पण हातून गेला आणि नंतर मी कन्नाथिल मुथामित्तलमध्ये मणी सरांसोबत काम करू शकले नाही.'' तिने राजकुमार हिराणी यांच्याशी झालेल्या तिच्या संभाषणाचा तपशील देखील शेअर केला, ज्यामध्ये हिराणी यांनी तिला आश्वासन दिले की तिची बदली तिच्या कोणत्याही चुकांमुळे झाली नाही. तिने सांगितले की सिनेइंडस्ट्रीत असे निर्णय सामान्य आहेत आणि बहुतेकदा हे निर्णय अनेक कारणांमुळे घेतले जातात, जे कलाकारांच्या कंट्रोलच्या बाहेर असतात.

भूमिका चावला हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांसह अनेक सिनेइंडस्ट्रीमध्ये तिच्या कामासाठी ओळखली जाते. 'तेरे नाम' मध्ये तिच्या अभिनयाने तिने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

Web Title: Kareena Kapoor wasn't Salman's first choice for 'Jab We Met', but this actress was chosen...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.