करीना कपूरला लग्न न करण्याचा मिळाला होता सल्ला, लोक म्हणाले होते - "करिअर संपेल"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 16:32 IST2024-09-23T16:31:03+5:302024-09-23T16:32:14+5:30
Kareena Kapoor : अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सतत चर्चेत येत असते. नुकतेच करीना कपूरने खुलासा केला की, लोकांनी तिला लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. जर तिने असे केले तर तिची कारकीर्द संपुष्टात येईल असे लोक म्हणाले होते.

करीना कपूरला लग्न न करण्याचा मिळाला होता सल्ला, लोक म्हणाले होते - "करिअर संपेल"
अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सतत चर्चेत येत असते. नुकतेच करीना कपूरने खुलासा केला की, लोकांनी तिला लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. जर तिने असे केले तर तिची कारकीर्द संपुष्टात येईल असे लोक म्हणाले.
फिव्हर एफएमला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, 'लोक मला म्हणायचे की लग्न करू नकोस. तुमचे करिअर संपेल. लोकांच्या या गोष्टींवर मी म्हणायचे की माझं करिअर संपलं तर ठीक आहे. लग्नानंतर आणि मुले झाल्यावर मी जास्त काम केले आहे. म्हणूनच मला वाटते की हे आव्हान स्वीकारणे, स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे.
करीनाने २०१२ मध्ये सैफशी थाटला संसार
सैफ अली खान आणि करीना कपूर टशन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जवळ आले आणि काही वर्षे डेटिंग केल्यानंतर १६ ऑक्टोबर २०१२ रोजी दोघांनी लग्न केले. दोघांना दोन मुले आहेत, तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान. सैफ अली खानचे हे दुसरे लग्न होते. याआधी सैफने अमृता सिंगसोबत लग्न केले होते, त्याने २००४ मध्ये घटस्फोट घेतला होता. या लग्नापासून सैफला दोन मुले आहेत, सारा अली खान आणि इब्राहिम अली खान पतौडी.
वर्कफ्रंट
करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची हंसल मेहताच्या 'द बकिंघम मर्डर्स' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आगामी काळात ती सिंघम ३ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर हे कलाकार आहेत. हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.