Video: तैमूर फोटोग्राफर्सवर ओरडला, काचेच्या गेटवर धडकला...! माँ बेबोचा पारा चढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 13:23 IST2021-03-12T13:21:21+5:302021-03-12T13:23:09+5:30
तैमूरने असे काही केले की, मम्मी करिनाचा पारा चढला. व्हिडीओत बेबो तैमूरवर ओरडताना दिसतेय.

Video: तैमूर फोटोग्राफर्सवर ओरडला, काचेच्या गेटवर धडकला...! माँ बेबोचा पारा चढला
काल करिश्मा कपूरची मुलगी समायरा हिचा 16 वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. समायराची मावशी करिना कपूर तैमूरसोबत या बर्थ डे पार्टीला पोहोचली. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. अलीकडे मोठा भाऊ झालेल्या तैमूरने असे काही केले की, मम्मी करिनाचा पारा चढला. व्हिडीओत बेबो तैमूरवर ओरडताना दिसतेय.
समायराच्या वाढदिवसासाठी करिना, तिची आई बबीता आणि तैमूर असे तिघे काल करिश्माच्या घरी पोहोचलेत. गाडीतून उतरल्यानंतर बेबो पापाराझींना पोज देत असताना अचानक तैमूर गाडीखाली उतरला आणि फोटोग्राफर्सवर ओरडत आतमध्ये पळत सुटला. इतकेच नाही पळताना काचेच्या दरवाज्यावर धडकला. स्टाफच्या लोकांनी आणि करिनाने लगेच तैमूरला पकडले. तैमूरच्या या वागण्यामुळे बेबो प्रचंड नाराज दिसली. पण तरिही पापाराझींना अभिवादन करायला ती विसरली नाही.
(साभार)
यावेळी करिनाने लाईट ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला होता. तर तैमूरने डार्क ब्ल्यू कलरची टी-शर्ट व डेनिम जीन्स घातली होती.
करिना कपूरने काही दिवसांपूर्वीच दुस-या मुलाला जन्म दिला. अद्याप करिनाच्या दुसºया मुलाचा चेहरा चाहत्यांना दिसलेला नाही. महिला दिनी बेबोने मुलासोबतचा एक फोटोही पोस्ट केला होता. मात्र, यात मुलाचा चेहरा दिसत नव्हता. अद्याप सैफिनाने आपल्या बाळाच्या नावाबद्दलही माहिती दिलेली नाही.
तैमूरचा खास लूक
(साभार)
काल महाशिवरात्रीच्या दिवशी तैमूरचा एक फोटो दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होता. यात फोटोत यात तैमूर शंकराच्या गेटअपमध्ये दिसत आहे. माथ्यावर महादेवाप्रमाणेच भस्म आणि त्यावर तिसरा डोळा असे महादेवाला साजेसे रुप धारण केले आहे.