75 वर्षांची आजीबाई दिसतेयस...! ‘बेबो’ करिना कपूर झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 15:51 IST2021-07-06T15:48:45+5:302021-07-06T15:51:49+5:30

बेबोनं फोटो शेअर केले आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

kareena kapoor shocking transformation went viral trollers gave the tag of old | 75 वर्षांची आजीबाई दिसतेयस...! ‘बेबो’ करिना कपूर झाली ट्रोल

75 वर्षांची आजीबाई दिसतेयस...! ‘बेबो’ करिना कपूर झाली ट्रोल

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच करिना ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात दिसणार आहे. यात आमिर खान लीड रोलमध्ये आहे.

बेबो अर्थात करिना कपूर ( Kareena Kapoor) सध्या काय तर सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय. बेबोनं वर्कआऊटचे फोटो शेअर केले आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.
गेल्या 21 फेब्रुवारीला बेबोने दुस-या बाळाला जन्म दिला. प्रेग्नंसीमध्ये करिनाचे वजन वाढले होते. आता ते कमी करायचे म्हणजे, वर्कआऊट, डाएट आलेच. करिनानं त्याची सुरुवात केलीय. तिचे वर्कआऊटचे फोटो व व्हिडीओ त्याचा पुरावा आहेत. पण हेच व्हिडीओ व फोटो पाहून लोकांनी बेबोची खिल्ली उडवायला सुरूवात केली. 
आतंराष्ट्रीय योगा दिनानिमित्त म्हणजेच २१ जूनला करीनानं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत करीना नो मेकअप लुकमध्ये योग करताना दिसत आहे. ( Kareena Kapoor troll)

‘दोन मुलांना जन्म दिल्यानंतर आणि आता प्रसूतीच्या चार महिन्यांनंतर मी खूप थकले होते. पुन्हा सर्व सुरु करताना खूप त्रास होतोय. पण आज मी पुन्हा एकदा हळूहळू सुरुवात करत आहे,’ अशा आशयाचे कॅप्शन तिनं या फोटोला दिलं होतं. पण या फोटोत करिनाच्या चेह-यावरच्या वाढत्या वयाच्या खुणा पाहून जणू नेटकºयांना आयती संधी मिळाली.

तू इतनी सूजी हुई क्यों दिख रही हो बेबो? बेबो अब तुम बूढी हो गई हो, अशा काय काय कमेंट्स करत अनेकांनी करिनाला ट्रोल केले.  तू 75 वर्षांची म्हातारी दिसतेय, असं एका युजरनं लिहिलं.


 

पहिला मुलगा तैमूर याच्यावेळी गरोदर असताना करिनाचं वजन प्रचंड वाढलं होतं. मात्र प्रेग्नंसीनंतर 5 महिन्यातच ती आपल्या जुन्या शेपमध्ये परतली होती. 5 महिन्यांत तिनं 15 किलो वजन कमी केलं होतं.  दुस-या प्रेग्नंसी फार वजन वाढू नये, याची बेबोने काळजी घेतली होती. पण तरीही वजन वाढलं. आता बेबो हे वजन कमी करण्यासाठी जिममध्ये घाम गाळतेय.  
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच करिना ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात दिसणार आहे. यात आमिर खान लीड रोलमध्ये आहे.

Web Title: kareena kapoor shocking transformation went viral trollers gave the tag of old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.