करीना कपूरने शेअर केले खास फोटो, रांगोळीसोबत खेळताना दिसला जेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 16:11 IST2023-11-12T16:10:51+5:302023-11-12T16:11:23+5:30

अभिनेत्री करीना कपूरच्या कुटुंबात दिवाळीचा उत्साह दिसून आला.

Kareena Kapoor shared a special photo, Jeh was seen playing with Rangoli | करीना कपूरने शेअर केले खास फोटो, रांगोळीसोबत खेळताना दिसला जेह

करीना कपूरने शेअर केले खास फोटो, रांगोळीसोबत खेळताना दिसला जेह

दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात दिवाळीची धामधुम पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी देखील दिवाळी साजरी करत आहे. अभिनेत्री करीना कपूरच्या कुटुंबात दिवाळीचा उत्साह दिसून आला. या सेलिब्रेशनचे फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये करीना, तिचा पती सैफ अली खान आणि त्यांची मुले तैमूर आणि जेह दिसत आहेत.


करीनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तैमूर रांगोळी काढताना दिसतोय तर जेह रांगोळीच्या रंगांशी खेळताना दिसत आहे. तर सैफ मागे उभा असून क्यूट एक्सप्रेशन देताना पाहायला मिळाली.  या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.  करीना आणि सैफचा मोठा मुलगा तैमूर 20 डिसेंबरला 7 वर्षांचा होणार आहे. तर जेह अजून अडीच वर्षांचा आहे.

करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती आता 'सिंघम अगेन'मधून पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. तर याशिवाय ती लवकरच 'द क्रू'मध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत तब्बू, क्रिती सेनॉन आणि दिलजीत दोसांझही असतील. नेत्री म्हणून करीना कपूर हिची ओळख आहे.

Web Title: Kareena Kapoor shared a special photo, Jeh was seen playing with Rangoli