Throwback: एकमेकांच्या प्रेमात वेडे होते करिना व शाहिद कपूर, ‘या’ व्यक्तिमुळे अचानक झालं ब्रेकअप!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 18:19 IST2022-01-25T18:18:00+5:302022-01-25T18:19:10+5:30
Shahid Kapoor Kareena Kapoor Love Story: दोघंही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. करिना तर शाहिदच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. पण अनेक बॉलिवूडच्या प्रेमकथेसारखी ही प्रेमकहाणीही ‘अधुरी’ राहिली.

Throwback: एकमेकांच्या प्रेमात वेडे होते करिना व शाहिद कपूर, ‘या’ व्यक्तिमुळे अचानक झालं ब्रेकअप!!
Shahid Kapoor Kareena Kapoor Love Story: आताश: शाहिद कपूर (Shahid Kapoor) व करिना कपूर (Kareena Kapoor ) दोघंही भूतकाळ विसरून आपआपल्या संसारात आनंदी आहेत. अर्थात त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा आजही होतांना दिसते. शाहिद व करिना दोघंही दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. जवळपास 5 वर्ष चाललेलं हे नातं एखाद्या परिकथेसारखं होतात, असंही म्हणतात. दोघंही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. करिना तर शाहिदच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. पण अनेक बॉलिवूडच्या प्रेमकथेसारखी ही प्रेमकहाणीही ‘अधुरी’ राहिली.
शाहिद व करिनाचं बे्रकअप का झालं? यामागच्या वेगवेगळ्या कथा ऐकवल्या जातात. पण चर्चा खरं मानाल तर, या ब्रेकअपसाठी करिनाचं कुटुंब जबाबदार होतं. होय, रिपोर्टनुसार करिना व शाहिदचं नातं बेबोची आई बबीता कपूर यांना जराही मान्य नव्हतं. अगदी करिनाची बहीण करिश्मा ही सुद्धा या नात्याच्या विरोधात होती.
करिनाला तिच्या प्रत्येक सिनेमात शाहिद कपूर हिरो हवा असायचा. ती निर्मात्यांना तशी गळ घालायची. ही गोष्ट बबीतांना खटकत होती. अशात करिना व शाहिदचा ‘फिदा’ रिलीज झाला आणि यानंतर दोघांमधील मतभेद वाढत गेले. पुढे शाहिदने ‘किस्मत कनेक्शन’ साईन केला आणि करिनाने ‘टशन’ साईन केला, तोपर्यंत दोघांचीही पसंत बदलली होती. ‘टशन’मध्ये काम करत असताना करिनाला सैफ अली खान आवडू लागला होता आणि शाहिदचा ‘किस्मत कनेक्शन’ची हिरोईन विद्या बालनमधला इंटरेस्ट वाढला होता. यामुळे करिना व शाहिद यांच्यातील वाद वाढत गेले. करिनाच्या आईनेही या वादात लेकीची साथ दिली. अखेर नेहमीच्या भांडणांना कंटाळून करिना व शाहिदने ब्रेकअपचा निर्णय घेतला.
2007 मध्ये करिना कपूर सैफला डेट करू लागली. पाच वर्षे डेट केल्यानंतर करिनाने सैफसोबत लग्न केलं. शाहिद कपूर यानेही करिनाला विसरून मीरा राजपूत हिच्याशी लग्नगाठ बांधली. आता करिना व शाहिद आपआपल्या संसारात आनंदी आहेत.