इरफान खानसोबत ह्या सिनेमात झळकणार करीना कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 20:00 IST2019-02-06T20:00:00+5:302019-02-06T20:00:00+5:30
अभिनेता इरफान खान लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर भारतात परतला आहे आणि त्याने आगामी प्रोजेक्टवर काम करायला सुरूवात केली आहे.

इरफान खानसोबत ह्या सिनेमात झळकणार करीना कपूर
इरफान खानच्या हिंदी मीडियम चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्माते भूषण कुमार व दिनेश विजन यांनी या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या सीक्वलबाबत इरफान खूप उत्सुक आहे. याच दरम्यान इरफानला कॅन्सर असल्याचे निदान झाले आणि त्याला उपचारासाठी लंडनला जावे लागले. आता इरफान भारतात परतला असून पुढील उपचार मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात करत आहेत.
इरफान भारतात परतल्यानंतर पुन्हा हिंदी मीडियम २च्या कामाला सुरूवात झाली. या चित्रपटाची स्क्रीप्ट तयार असून इरफानची या चित्रपटाची कथादेखील वाचून झाली आहे. इरफानने या चित्रपटाला हिरवा कंदिल दिल्यावर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटातील कलाकारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात इरफानसोबत अभिनेत्री करीना कपूरला घेण्याचा विचार सुरू आहे. तिला या स्क्रीप्ट वाचून दाखवली असून तिला आवडली देखील आहे. निर्मात्यांना आशा आहे की हिंदी मीडियम २मध्ये काम करायला तयार होईल. जर करीना या चित्रपटात काम करण्यास तयार झाली तर पहिल्यांदा करीना कपूर व इरफान खान एकत्र रुपेरी पडद्यावर झळकतील.
'हिंदी मीडियम' चित्रपटात मुलीला शाळेत प्रवेश घेताना आई वडिलांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, हे दाखवण्यात आले आहे. हिंदी मीडियम २चे कथानक अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या चित्रपटात करीना व इरफानला एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.