आई झाल्यानंतर बदललं आयुष्य; करीना कपूर म्हणाली, "अवॉर्ड शोमध्ये झळकण्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 18:08 IST2025-06-02T18:08:01+5:302025-06-02T18:08:30+5:30

नक्की काय म्हणाली करीना कपूर?

kareena kapoor says life changed after becoming mother says now i work less give more time to kids | आई झाल्यानंतर बदललं आयुष्य; करीना कपूर म्हणाली, "अवॉर्ड शोमध्ये झळकण्यासाठी..."

आई झाल्यानंतर बदललं आयुष्य; करीना कपूर म्हणाली, "अवॉर्ड शोमध्ये झळकण्यासाठी..."

अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) दोन मुलांची आई आहे. २०१६ मध्ये तिने तैमुरला जन्म दिला. तर २०२१ मध्ये ती जेहची आई झाली. करीनाची दोन्ही मुलं त्यांच्या क्युटनेसने आणि अगदी टिपिकल कपूर कुटुंबातले दिसत असल्याने लक्ष वेधून घेतात. नुकतंच करीनाने आई झाल्यानंतरचं आयुष्य कसं बदललं हे सांगितलं आहे. तसंच तिने काम करणंही कमी केल्याचा खुलासा केला. नक्की काय म्हणाली करीना कपूर?

Nod मॅगजीनला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूर म्हणाली, "मी आता भूमिकांच्या मागे धावत नाही. आजकालच्या तरुण अभिनेत्री एक सिनेमा संपवून लगेच दुसरा सिनेमाच्या शूटसाठी जातात. मीही एकेकाळी हेच करायचे. आता माझा तो काळ संपला आहे याचा मला आनंद आहे. मी भलेही कमी सिनेमे करते पण विचारपूर्वक करते. कधी आणि किती काम करायचं हे मी ठरवते. एखाद्या अवॉर्ड शोमध्ये झळकण्यासाठी आपल्या मुलांना घरी एकटं सोडणं मला पटत नाही."

ती पुढे म्हणाली, "आई झाल्यानंतर माझ्या जीवनशैलीतही बदल झाला आहे. मी सकाळी लवकर उठून वर्कआऊट करते. मी टाईम घालवते. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आमचं डिनर झालेलं असतं. रात्री ९.३० पर्यंत आमच्या घरातील लाईट्स बंद होतात. सैफ आणि मी मुलांसोबत किचनमध्येही असतो. सैफला केरळ स्टाईल जेवण आवडतं. तो इडियप्पम आणि नारळ घालून केलेली ग्रेवीचे पदार्थ बनवायला ट्राय करत असतो. मला तर दिवसातून एकदा तरी भारतीय पदार्थ खायचाच असतो. तो माझा नियमच आहे."

करीना शेवटची 'सिंघम अगेन'मध्ये दिसली. याशिवाय तिने ओटीटीवरही पदार्पण केलं. 'जाने जान' आणि 'द बर्किंगघम मर्डर्स' हे तिचे सिनेमे चर्चेत होते. यानंतर ती मेघना गुलजारच्या 'दायरा' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत पृथ्वीराज सुकुमारन आहे.

Web Title: kareena kapoor says life changed after becoming mother says now i work less give more time to kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.