या चित्रपटात करिना कपूरने दिला होता शॉकिंग इंटिमेट सीन, आता केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 12:11 IST2020-03-09T12:09:08+5:302020-03-09T12:11:06+5:30
काय म्हणाली बेबो...

या चित्रपटात करिना कपूरने दिला होता शॉकिंग इंटिमेट सीन, आता केला खुलासा
करिना कपूरचे नाव घेतले की आठवते ती ‘कभी खुशी कभी गम’मधील ‘पू’ आणि ‘जब वी मेट’मधील गीत. बेबोच्या या भूमिका यादगार ठरल्या. यानंतरच्या काळात बेबोने अशा अनेक यादगार भूमिका केल्या. खरे तर करिनाच्या चाहत्यांना तिचे सर्वच चित्रपट आवडतात. पण बेबोसाठी यादगार ठरलेला सिनेमा कोणता? तर ‘हिरोईन’. होय, बेबोने एका ताज्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला. यावेळी आपल्या आवडत्या इंटिमेट सीनबद्दलही ती बोलली.
2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरोईन’ या सिनेमात करिना व अर्जुन रामपाल यांच्यावर एक इंटिमेट सीन चित्रीत करण्यात आला होता. या सीनची प्रचंड चर्चा झाली होती.
अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत करिनाने या इंटिमेट सीनबद्दल सांगितले. ‘या चित्रपटासाठी मी सगळे काही केले. अगदी न्यूड सीनही दिला. चित्रपटाला प्रेक्षकांचा कसाही प्रतिसाद मिळाला असेल, पण हा सिनेमा माझ्यासाठी खास आहे.
या चित्रपटातील भूमिका माझ्यासाठी प्रचंड कठीण होती. रोज खरी आल्यावर मी डिस्टर्ब असायचे. आज असा एखादा चित्रपट आॅफर झाला तर मी तो करू शकेल, असा मला वाटत नाही. मधूर भांडारकर यांनी या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. हा सिनेमा मी कधीही विसरू शकत नाही. माझ्या आवडत्या टॉप 5 सिनेमात हा सिनेमा आहे,’ असे ती म्हणाली.
याच मुलाखतीत करिनाने ‘जब वी मेट’ या सिनेमादरम्यान शाहिद कपूरशी झालेल्या ब्रेकअपबद्दलही खुलासा केला होता. ‘जब वी मेट’चे शूटींग सुरु असताना करिना सोबत सोबत ‘टशन’चे शूटींग करत होती. ‘जब वी मेट’च्या सेटवर करिनाचे शाहिदसोबत ब्रेकअप झाले होते तर दुसरीकडे ‘टशन’च्या सेटवर सैफ अली खानसोबत तिची भेट झाली होती. याच चित्रपटादरम्यान करिना व सैफ एकमेकांच्या प्रेमात पडले होते.