करिनासाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 21:00 IST2019-02-08T21:00:00+5:302019-02-08T21:00:00+5:30
नेहमी प्रमाणे बिनधास्त दिसणारी करिना या व्हिडीओत मात्र अनकर्म्फटेबल पाहायला मिळत आहे.

करिनासाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना
एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात. या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. असंच काहीसं घडलं आहे बॉलिवूडची बेबो म्हणजे बेगम करिना कपूरबरोबर. सध्या वेगळ्याच कारणामुळे ती चर्चेत आली आहे. त्याला कारणीभूत ठरले लॅक्मे फॅशन वीक. होय, करिनाचा लॅक्मे फॅशन वीकमधला एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. नेहमी प्रमाणे बिनधास्त दिसणारी करिना या व्हिडीओत मात्र अनकर्म्फटेबल पाहायला मिळत आहे.
त्याचे झाले असे की, रॅम्पवॉकवेळी तिने ब्लॅक ऑफ शोल्डर गाउन परिधान केला होता. हाच डिझायनर ड्रेस करिनासाठी मात्र डोकेदुखी ठरला. पूर्ण वेळ ती हा ड्रेस सावरताना दिसली.मुळात हा ड्रेस खूपच टाइट होता. त्यामुळे करिना कंम्फर्ट नव्हती. तिच्या चेह-यावर नर्व्हस असल्याचे एक्सप्रेशन उमटले होते.संपूर्ण इव्हेंटमध्ये करिना त्रस्त दिसली. मात्र दुसरीकडे तिचा नर्व्हसनेस पाहून ती सोशल मीडियावर करिनाला नेटीझन्सने ट्रोल केले आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स भन्नाट प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे.मात्र तिची अवस्था नेटीझन्सनाही कळल्यामुळे फक्त आणि फक्त ड्रेसवरच चर्चा सोशल मीडियावरही रंगत असल्याचे पाहायला मिळतंय.