वीरे दी वेडिंगमध्ये करिना कपूर खान दिसणार हटके अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 15:00 IST2017-10-25T09:30:07+5:302017-10-25T15:00:07+5:30

वीरे दी वेडिंग या चित्रपटाच्या वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने करतायेत. कालच या चित्रपटाचे फर्स्ट लूक लाँच करण्यात आले. टीजर ...

Kareena Kapoor Khan will be seen in Veer The Wedding | वीरे दी वेडिंगमध्ये करिना कपूर खान दिसणार हटके अंदाजात

वीरे दी वेडिंगमध्ये करिना कपूर खान दिसणार हटके अंदाजात

रे दी वेडिंग या चित्रपटाच्या वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने करतायेत. कालच या चित्रपटाचे फर्स्ट लूक लाँच करण्यात आले. टीजर पोस्टरमध्ये करिना कपूर खूप वेगळ्याच अंदाजात दिसतेय. तुम्ही तिचा हा लूक बघून नक्कीच हैराण व्हाल. चित्रपटाचा फर्स्ट हे चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवणारे आहे. यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाचे पहिले पोस्टरसुद्धा रिलीज केले आहे.  




या पोस्टरमध्ये सगळ्या जणी खूप सुंदर दिसतायेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोस्टर अगदी योग्यवेळी रिलीज केले आहे. कारण सध्या सगळीकडे लग्नाचा माहोल आहे. या पोस्टरमध्ये सोनम कपूर, करिना कपूर आणि शिखा तलसानिया नाचताना दिसतायेत तर स्वरा भास्कर फक्त उभी राहुन या सगळ्यांकडे लक्षपूर्वक बघताना दिसते. चिपटाच्या पोस्टरवर रिलीज डेटसुद्धा रिव्हिल करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी 18 मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या पहिले शूटिंगचे शेड्यूल दिल्लीत करण्यात आले होते. यादरम्यान एअरपोर्टवरची करिना आणि तैमूर खानचा फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या चित्रपटासाठी करिनाने आपले वजन खूप केले आहे.  

ALSO READ :  तयार असा, आला ‘वीरे दी वेडिंग’चा फर्स्ट लूक !!

या चित्रपटाचे दिग्दर्शन शंशाक घोष करतो आहे. यात करिनासोबत रोमांस करताना सुमीत व्यास दिसणार आहे. चित्रपटाची बरीचशी शूटिंग दिल्लीतच होणार आहे.  वीरे दी वेडिंग चित्रपटाची कथा चार मुलींच्या भवती फिरणारी आहे. वीरे दी वेडिंग'मध्ये करिना   एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. बेबो प्रॅक्टिकल तर सोनमला थोडीशी हळवी असेल. आपल्याला जे वाटते, ज्यामुळे आनंद मिळतो त्याच गोष्टी करण्यात ती विश्वास ठेवणारी मुलगी आहे.’ सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे

लवकरच करिनाचा मुलगा तैमूर एक वर्षांचा होणार आहे. सैफ अली खान आणि करिना कपूर त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या तयारी लागले आहेत. तैमूरच्या वाढदिवसाच्या कोणकोण पाहुणे येणार याची लिस्टसुद्धा बनवून झाली आहे. 

Web Title: Kareena Kapoor Khan will be seen in Veer The Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.