करिना कपूरला कोणत्या अभिनेत्यासोबत नव्हे तर या राजकारण्यासोबत जायचे होते डेटवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 19:04 IST2019-06-06T19:02:39+5:302019-06-06T19:04:32+5:30
Rendezvous With Simi Garewal या कार्यक्रमात सिमीने करिनाला विचारले होते की, तुला या जगातील एका व्यक्तीसोबत डेटवर जायचे असेल तर तू कोणाची निवड करशील?

करिना कपूरला कोणत्या अभिनेत्यासोबत नव्हे तर या राजकारण्यासोबत जायचे होते डेटवर
Rendezvous With Simi Garewal हा कार्यक्रम अनेक वर्षांपूर्वी प्रचंड गाजला होता. या चॅट शोमध्ये येऊन बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी अभिनेत्री सिमी गरवालसोबत मनसोक्त गप्पा मारत असत. या कार्यक्रमात अनेकांनी आपले सिक्रेट्स सांगितले होते. तसेच आपल्याला काय करायला आवडेल याबाबत देखील दिलखुलासपणे गप्पा मारल्या होत्या. सिमीच्या कार्यक्रमात अभिनेत्री करिना कपूरने देखील हजेरी लावली होती. त्यावेळी तिने नुकताच बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. या मुलाखतीत तिने तिच्या आणि तिच्या कुटुंबियांविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या होत्या. या कार्यक्रमात तिने दिलेल्या एका उत्तराची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती.
Rendezvous With Simi Garewal या कार्यक्रमात सिमीने करिनाला विचारले होते की, तुला या जगातील एका व्यक्तीसोबत डेटवर जायचे असेल तर तू कोणाची निवड करशील? त्यावर करिनाने कोणत्या अभिनेत्याचे अथवा बॉलिवूडशी संबधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे नाव न घेता एका राजकारण्याचे नाव घेतले होते. ती म्हणाली होती की, मी हे बोलू की नको हेच मला कळत नाही. खरे तर हे कॉन्ट्रोव्हर्शल ठरू शकते. पण तरीही मी सांगते. मला राहुल गांधींसोबत डेटवर जायला आवडेल. मी त्यांचे फोटो अनेकवेळा मासिकांमध्ये पाहात असते. मला त्यांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. माझ्या कुटुंबातील अनेकजण चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत तर त्यांच्या कुटुंबातील अनेकजण राजकारणाशी संबंधित आहेत. त्यामुळे आम्ही यावर खूप चांगल्या गप्पा मारू शकतो असे मला वाटते.
करिनाने सिमीच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांना डेट करायला आवडेल असे सांगितले असले तरी तिने या मुलाखतीनंतर अनेक वर्षांनी तिने तिचे हे स्टेटमेंट बदलले होते. तिने 2009 सालच्या एका मुलाखतीत म्हटले होते की, ही खूप जुनी गोष्ट आहे. आमच्या दोघांची कुटुंबं खूप प्रसिद्ध असल्याने बहुधा मी त्यावेळी असे म्हटले असेल. मला त्यांना डेट करायचे नाहीये. पण त्यांना घरी बोलवून जेवायला घालायला मला नक्कीच आवडेल. त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून मला पाहायचे आहे.