मैं हीरोइन हूँ...! करिना कपूरनं इतक्या कोटीत साईन केला ‘बाहुबली’ प्रभासचा सिनेमा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 18:21 IST2022-07-06T18:13:06+5:302022-07-06T18:21:10+5:30
Kareena Kapoor Khan : होय, चर्चा खरी मानाल तर प्रभासच्या बिग बजेट सिनेमात बेबोची एन्ट्री झालीये आणि यासाठी तिने मानधनापोअी तगडी रक्कम वसूल केली आहे.

मैं हीरोइन हूँ...! करिना कपूरनं इतक्या कोटीत साईन केला ‘बाहुबली’ प्रभासचा सिनेमा?
‘बाहुबली’ स्टार प्रभासचे (Prabhas ) मागचे दोन्ही सिनेमे आपटले. ‘साहो’ आपटला, पाठोपाठ ‘राधेश्याम’ या चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पण सलग दोन सिनेमे फ्लॉप होऊनही प्रभासची डिमांड कमी झालेली नाही. प्रभासच्या हातात अनेक बिग बजेट सिनेमे आहेत. दिग्दर्शक ओम राऊतच्या ‘आदिपुरूष’ या सिनेमात तो झळकणार आहे. याशिवाय संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’मध्येही त्याची वर्णी लागली आहे.
सध्या प्रभासच्या ‘स्पिरिट’ (Spirit) या आगामी चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट आहे. या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट कोण हिरोईन दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. अद्याप तरी ‘स्पिरिट’मधील हिरोईनच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण चर्चा खरी मानाल तर या चित्रपटासाठी बेबोचं अर्थात करिना कपूरचं (Kareena Kapoor) नाव फायनल झालं आहे.
करिनाने प्रभासच्या ‘स्पिरिट’ला होकार दिल्याची माहिती नाही. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी करिनाने मोठी रक्कमही वसूल केली आहे. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, करिनाने या चित्रपटासाठी 17 कोटींची मागणी केली आणि निर्मात्यांनी तिची ही मागणी पूर्ण केली.
‘स्पिरिट’ पॅन इंडिया स्तरावर रिलीज होणार आहे. म्हणजेच एकाचवेळी अनेक भाषांमध्ये तो रिलीज होणार आहे. ‘कबीर सिंग’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत आणि म्हणूनच या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय.
‘स्पिरिट’साठी याआधी अनेक अभिनेत्रींच्या नावाची चर्चा झाली. अगदी कियारा अडवाणी पासून रश्मिका मंदाना अशा नावांची चर्चा होती. कियारासोबत संदीप रेड्डी वांगा यांनी ‘कबीर सिंग’मध्ये काम केलं आहे. तर रश्मिका ही संदीप रेड्डींच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे या दोघींपैकी कुणी एक ‘स्पिरिट’मध्ये झळणार अशी चर्चा होती. पण आता करिना कपूरने या दोन्ही अभिनेत्रींचा पत्ता कट करत हा 300 करोडी सिनेमा आपल्या नावावर केला आहे.