चेह-यावर थकवा, वाढलेले वजन, बाळाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच सैफसोबत बाहेर फिरताना दिसली करिना कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 17:49 IST2021-03-10T17:41:48+5:302021-03-10T17:49:02+5:30
Kareena Kapoor Khan and Saif Ali Khan first public appearance together :छोटे नवाबच्या जन्मानंतर करिना बाळासह विश्रांती करताना दिसली. हळूहळू आता पुन्हा एकदा करिना एक्टीव्ह होत आहे. नुकतीच सैफसोबत ती बाहेर फिरताना दिसली.

चेह-यावर थकवा, वाढलेले वजन, बाळाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच सैफसोबत बाहेर फिरताना दिसली करिना कपूर
दुस-या बाळाच्या जन्म झाल्यापासून चाहत्यांनाही छोटे नवाबला पाहण्याची उत्सुकता होती. मात्र अजूनपर्यंत बाळाची झलक पाहायला मिळाली नव्हती. अखेर महिला दिनाचे औचित्य साधत करिनाने चाहत्यांना छोटे नवाबची झलक दाखवली होती. बाळाला कुशीत घेतल्याचा फोटो तिने शेअर केला होता. शेअर केलेल्या फोटो बाळाचा चेहरा दिसत नसला तरी एक झलक पाहायला मिळाल्यामुळे चाहत्यांनीही कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला होता.
प्रेग्नंसी दरम्यान अनेकदा कामाच्या निमित्ताने बेबो करिना फिरताना दिसायची. तसेच वर्कआऊट करत सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसायची. छोटे नवाबच्या जन्मानंतर करिना बाळासह विश्रांती करताना दिसली. हळूहळू आता पुन्हा एकदा करिना एक्टीव्ह होत आहे.
नुकतीच सैफसोबत ती बाहेर फिरताना दिसली. बाळाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच करिनाला अशारितीने फिरताना पाहिले गेले. यावेळी दोघांनी चेह-यावर मास्क लावले होते. यावेळी करिना मात्र काहीशी थकलेली दिसली. वाढलेल्या वजनामुळे करिनाच्या लूकमध्येही बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच या सैफिनाने मुंबईमध्ये नवीन घर विकत घेतले. दुस-या बाळाच्या जन्माआधीच बेबो सैफसोबत या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. छोटे नवाबच्या येण्याने करिना व सैफ अली खान जाम खूश आहेत.सैफ करिनाला एक खास गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.
बेबोसाठी त्याने खास सरप्राईज प्लॅन केले आहे. दुस-या मुलाच्या जन्मानंतर सैफ करिनासाठी ही गाडी विकत घेणार आहे. Mercedes-Benz G-Class या कारची किंमत तब्बल 2.5 कोटी इतकी आहे. त्यामुळे बेबोची अवस्था आज मैं उपर आसमाँ निचे अशी झाली असणार हे मात्र नक्की.
रणधीर कपूर सांगतायेत, करिना कपूरचे बाळ दिसते घरातील या सदस्यासारखे
करिना आणि सैफला बाळ झाल्यापासून त्यांचे बाळ कसे दिसते याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागलेली आहे. करिना आणि सैफचे बाळ कसे दिसते हे नुकतेच करिनाचे वडील अभिनेते रणधीर कपूर यांनी सांगितले आहे. रणधीर यांनी टाईम्स ग्रुपशी बोलताना सांगितले की, सगळीच बाळं सारखीच दिसतात. त्यामुळे बाळ कोणासारखे दिसते हे मला सांगता येणार नाही. पण सगळ्यांचे म्हणणे आहे की, बाळ अगदी त्याच्या मोठ्या भावासारखे म्हणजेच तैमुर सारखे दिसते. छोट्या बाळाच्या आगमनामुळे तैमुर प्रचंड खूश झाला आहे.